हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा
हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा Dainik Gomantak
गोवा

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

दैनिक गोमन्तक

मोरजी: मालपे-पेडणे येथील पर्यटन खात्याचे ‘हॉटेल गोवा दरबार’ मागच्या आठ वर्षांपासून बंद आहे. गेली अनेक वर्षे महसूल मिळवून देणाऱ्या या इमारतीकडे संबंधित प्रशासनाने एकदाही गांभीर्याने पाहिलेले नाही. सध्या ही इमारत भूत बंगला किंवा भंगार अड्डा बनली आहे. हा महसूल बुडवण्यास कोण कारणीभूत आहे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

एका बाजूने पेडणेतील सरकारची कार्यालये खासगी जागेत भाडे अदा करून चालविली जातात, तर दुसऱ्या बाजूने सरकारी जागा, इमारत विनावापर ठेवली जात आहे. त्यापेक्षा सरकारने ही जागा स्थानिक बेरोजगार युवकांना हॉटेल प्रकल्प उभारण्यासाठी द्यावी, अशीही मागणी केली जात आहे. सध्या पेडणेतील अग्निशमन दलाचे कार्यालय अडगळीच्या जागेत आहे.

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

अरुंद रस्ते, त्यात भर पडते ती बेशिस्त पार्किंगची. त्यामुळे अग्निशमन दलाचा बंब सहज शहरातून बाहेर पडत नाही. त्यातच दर गुरुवारी शहरात आठवड्याचा बाजार भरतो. तो रस्त्यावरच भरवला जातो. त्यामुळे अग्निशमन दलाला आदल्या रात्री आपली वाहने इतरत्र ठेवावी लागतात. सरकारने याचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला राष्ट्रीय महामार्गाशेजारील ही जागा उपलब्ध करून दिल्यास गैरसोय दूर होऊ शकते, असेही मत व्यक्त केले जाते.

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

रवींद्र भवनसाठी पूरक स्थळ

पर्यटन मंत्र्यांनी या ठिकाणी रवींद्र भवन उभारून स्थानिक कलाकारांची आजपर्यंतची मागणी पूर्ण करावी, असेही मत व्यक्त केले जात आहे. ही जागा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. जवळच रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग आहे. शिवाय मोपा विमानतळ होऊ घातले आहे.

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

या जागेपासून दोन किलोमीटर अंतरावर पेडणे शहर, पोलीस स्टेशन, सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे ही जागा रवींद्र भवनसाठी योग्य असून पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी धारगळ येथील क्रीडानगरीच्या जागेत रवींद्र भवन उभारण्यापेक्षा हॉटेल गोवा दरबार जागेत उभारावे, अशी मागणी कलाकार करत आहेत.

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

"हॉटेल गोवा दरबारच्या ठिकाणी तारांकित हॉटेल उभारण्याची योजना आहे. त्या प्रकल्पाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. येथे हॉटेल प्रकल्प झाला तर बेरोजगार युवक, टॅक्सी व्यावसायिक, लहान-मोठे व्यावसायिक यांना फायदा होऊ शकतो."

- दयानंद सोपटे, अध्यक्ष, गोवा पर्यटन विकास महामंडळ

हॉटेल गोवा दरबार... नव्हे, भंगार अड्डा

"पर्यटनमंत्री हे पेडणे मतदारसंघाचे असल्याने त्यांनी नवीन प्रकल्प आणले तर त्यांचे स्वागत होईल. ही जागा शेती तसेच कुळांची आहे. पर्यटन खात्याने हॉटेलसाठी ती संपादित केली होती. आता सरकारने ती जागा पेट्रोल पंपसाठी देऊन कुळांवर अन्याय केला आहे."

- राजन कोरगावकर, मिशन फॉर लोकल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT