Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: रुग्‍णालयांचे खासगीकरण नाही, लवकरच कॅन्‍सर इस्‍पितळ, घरापर्यंत आरोग्‍यसेवा; विश्‍वजीत राणे

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गोमेकॉतील रिक्त पदे नियमानुसारच भरली जातील; इन्सुलिन मोफत देणारे गोवा एकमेव राज्य

गोमन्तक डिजिटल टीम

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या कोणत्याही रुग्णालयाचे खासगीकरण होणार नाही. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयासाठी खासगीकरणाचा प्रस्ताव आला होता. मात्र, सर्व रुग्णालये सरकारच चालवेल.

तिसऱ्या व्यक्तीच्या हातात ती दिली जाणार नाहीत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज सभागृहात निक्षून सांगितले.

राज्यातील रुग्णालयांचे खासगीकरण केले जाणार असल्याच्या उठविलेल्या आवईवर मंत्री राणे यांनी पडदा टाकला. आरोग्य खाते, गोमेकॉ, अन्न व प्रशासन खात्याच्या मागण्या आणि पाठिंबा या विषयावर उत्तर देताना मंत्री राणे बोलत होते.

मंत्री होण्यापूर्वी गोमेकॉमध्ये उंदीर मुलांची बोटे खात होती. ही सुधारणा तत्काळ झालेली नाही, असे सांगत मंत्री राणे यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी दाखल करताना आलेला अनुभव सभागृहासमोर सांगितला. आरोग्य खात्याने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे असे म्हणतात; पण हॉस्पिटल बांधले म्हणून होत नाही.

एक एक प्रक्रिया विविध रुग्णालयांत सुरू करावी लागेल. पंतप्रधानांची जी काही आरोग्याविषयक धोरणे आहेत, त्यानुसार जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विरोधी आमदार असला तरी त्यांची कामे करावीच लागणार आहेत. आम्ही लाखो रुपयांचे इन्जेक्शन मोफत देत आहोत.

दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना आम्ही रातोरात १०८ रुग्णवाहिका सुरू केली होती. परंतु जनतेसाठी सुरू केलेली सेवा पुढे चालू ठेवली जात आहेत.

राणे म्हणाले की, गोमेकॉतील रिक्त पदे नियमानुसारच भरली जातील, सेवा विस्कळीत होता कामा नये. ‘रिलायन्स’मध्ये काम करणारे पद्मश्री डॉ. अमित मायदेव आपल्या ऑर्डरमध्ये गोमेकॉमध्ये येण्याची परवानगी मागितल्याचे सांगत ते म्हणाले, डॉ. अमित आल्यानंतर गोव्यात लिव्हर ट्रान्सप्लान्ट करू शकतो. आयव्हीएफ’बाबत कोणी विचारही केला नसेल; पण ही सुविधा गोव्यात सुरू केली आहे. अजूनही लोक रांगेत आहेत, पण त्यांची यशस्वीता काय ते सांगू शकत नाही.

...म्हणून आरोग्य खात्याच्या निधीमध्ये घट; मुख्यमंत्री

आरोग्यविषयक इमारतींच्या साधनसुविधांची कामे यापुढे सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत होतील. त्यामुळे आरोग्य खात्यासाठीच्या अर्थसंकल्पीय निधीत घट केली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

मधुमेह, कॅन्सर रुग्णांचा डाटा तयार करणार

मंत्री राणे म्हणाले, मी आरोग्यमंत्री म्हणून किमान १२ वर्षे काम करीत आहे. गोमेकॉत श्रीमंतही उपचार घेतात; कारण तेथे चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. कर्करोग उपचारांसाठी पंतप्रधान कार्यालय आणि टाटा मेमोरियल यांच्या माध्यमातून सेट स्ट्रक्चर उभारले जात आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने पावले उचलत आहोत. मधुमेह आणि कॅन्सर रुग्णांचा डाटा तयार केला जाणार आहे, त्यासाठी रजिस्ट्री ठेवली जात आहे.

काही निविदांना विलंब झाला; परंतु त्यासाठी थोडा वेळ लागतो. मधुमेहाच्या अनेक रुग्णांमध्ये उलटसुलट प्रकरणे आढळून आली आहेत. रुग्णांना इन्सुलिन मोफत देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे.
विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT