Amit Shah, Arvind Kejariwal Dainik Gomantak
गोवा

Amit Shah Arvind Kejriwal In Goa: गृहमंत्री अमित शहा आणि आपचे अरविंद केजरीवाल शनिवारी गोव्यात

Home Minister Amit Shah Arvind Kejriwal In Goa: ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हेही ०४, ०५ आणि ०६ ऑक्टोबर रोजी गोव्यात येणार आहेत.

Pramod Yadav

पणजी: गृहमंत्री अमित शहा आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी (०४ ऑक्टोबर) गोव्यात येत आहेत. अमित शहा माझे घर योजनेचा शुभारंभ करतील. तर, केजरीवाल गोव्यात तीन दिवस विविध कार्यक्रमात सहभाग घेतील. केजरीवाल तीन दिवस गोव्यात थांबणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे ‘माझे घर’ योजनेच्या शुभारंभासाठी शनिवारी गोव्यात येणार आहेत. राज्यातील अनधिकृत घरे कायदेशीर नोंदणी देण्यासाठी सरकारने ‘माझे घर’ योजना राबविली आहे. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असून, हा कार्यक्रम डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. 

दुसरीकडे ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हेही ०४, ०५ आणि ०६ ऑक्टोबर रोजी गोव्यात येणार आहेत. तीन दिवसीय दौऱ्यासाठी केजरीवाल ०३ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गोव्यात दाखल होतील. या दौऱ्यात ते जिल्हा पंचायत निवडणुकांपूर्वी पक्ष विस्ताराचा आढावा घेणार आहेत.

केजरीवाल ०४ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता मये येथे आप कार्यालयाचे उद्धाटन करतील. यानंतर कुडतरी येथे साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना भेटतील. पाच ऑक्टोबरला साडे तीन वाजता केजरीवाल म्हापसा येथे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. ०६ ऑक्टोबरला केजरीवाल पणजी येथे आयोजित भाजप सरकार विरोधातील कार्यक्रमात सहभाग घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT