HMPV Virus Dainik Gomantak
गोवा

HMPV Virus: डॉ. साळकर म्हणतायत "एचएमपीव्हीक गोंयकारांनी भिवपाची गरज ना!"

Dr. Shekhar Salkar on HMPV Virus: डॉ. साळकर यांच्या मते सध्या तरी गोव्याला घाबरण्याची गरज नाहीये, मात्र सावधगिरी बाळगणं कधीही चांगलं

Akshata Chhatre

HMPV Virus Updates Goa

पणजी: कोविडनंतर सध्या देशाला भेडसारवणारा प्रश्न म्हणजे चीनमधून जन्म घेतलेला एचएमपीव्ही व्हायरस. या एचएमपीव्ही व्हायरसचा उद्रेक वाढला असल्याने गोव्याला देखील भीती निर्माण झाली आहे की काय असा प्रश्न निर्माण केला जातोय. यावर पत्रकारांशी झालेल्या चर्चेत बोलताना मणिपाल हॉस्पिटल मधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, डॉ. शेखर साळकर यांनी महत्वाची माहिती दिली. डॉ. साळकर यांच्या मते सध्या तरी गोव्याला घाबरण्याची गरज नाहीये, मात्र सावधगिरी बाळगणं कधीही चांगलं आहे.

या व्हायरसवर उपाय अद्याप सापडलेला नाही, तरीही गोव्याने काळजी करण्याची गरज अजून वाटत नाहीये. देशातील गुजरात आणि बंगळुरू या भागांमध्ये लहान मुलांना या रोगाची लागण झाली असल्याने थोडी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय.

रोगासाठी लागणारी विशेष तपासणी सध्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, आणि नागरिक नक्कीच ही तपासणी करून घेऊ शकतात. इथे रुग्णांना एकूण २७ प्रकारच्या व्हायरसची माहिती दिली जाते व केवळ तासाभरात निदान होते असेही डॉक्टर म्हणालेत.

गोव्याच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांमध्ये अद्याप या व्हायरसचे रुग्ण सापडलेले नाही. तरीही हा संसर्गजन्य रोग असल्याने सर्वानी काळजी घेण्याची गरज आहे असे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले.

मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झालेली नाहीत, आरोग्यमंत्र्यांची माहिती

गोवा सरकारला अद्याप एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात केंद्राकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झालेली नाहीत. एचएमपीव्ही विषाणूबाबत केंद्राकडून जे निर्देश येतील, त्याचे पालन करू असं आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

World Cup 2025: वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर, 'या' युवा खेळाडूकडे संघाची कमान, संघात कोण-कोण?

Goa Beef Shortage: तेलंगणामधून 'गोमांस' आले, तरी भूक भागत नाही! गोव्यात पुरवठा मर्यादित; ग्राहक हवालदिल

SCROLL FOR NEXT