
पणजी : प्राणघातक कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता चीनमध्ये आणखी एका विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. एचएमपीव्ही म्हणजेच ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) नावाच्या विषाणूनं कहर केला आहे.
एचएमपीव्ही विषाणूचे भारतात दोन रूग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
गोवा सरकारला अद्याप एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात केंद्राकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झालेली नाहीत. एचएमपीव्ही विषाणूबाबत केंद्राकडून जे निर्देश येतील, त्याचे पालन करू असं आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितलं आहे.
कर्नाटकमध्ये एचएमपीव्ही विषाणूचे दोन रूग्ण आढळले आहेत. याच पाश्वभूमीवर गोवा शेजारील महाराष्ट्र राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
तरीही खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. तर दोन रूग्ण आढळल्यानंतर कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाय
खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमालने झाका.
साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावे.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.
भरपूर पाणी प्या, पौष्टिक पदार्थ खावे.
हे करू नये
हस्तांदोलन करणे टाळा.
टिश्यू पेपरचा पुनर्वापर करू नका.
आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे
एचएमपीव्ही विषाणू म्हणजे काय?
एचएमपीव्ही हा आरएनए व्हायरस आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे सर्दीसारखी लक्षणे दिसतात. थंड हवामानात या विषाणूचा धोका जास्त असतो. खोकला आणि ताप ही या विषाणुची सामान्य लक्षणे आहेत.
सर्वाधिक धोका कोणाला?
चीनमध्ये या विषाणुचे सर्वाधिक संक्रमण 14 वर्षाखालील मुलांमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. 5 वर्षांखालील मुले, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक, श्वसनाच्या समस्या लोकांना या विषाणुचा सर्वाधिका धोका असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.