Navneet Rana In Goa X
गोवा

Navneet Rana In Goa: 'हिंदू जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सबुरीने वागा'; गोव्यातील सभेत नवनीत राणांनी दिला इशारा

Navneet Rana Ponda Hindu Raksha Samiti: नजीकच्या काळात हिंदू राष्ट्र नक्कीच निर्माण होईल, असा दावा प्रखर हिंदुत्ववादी नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Navneet Rana Speech Ponda Goa

फोंडा: बहुसंख्य हिंदू जेव्हा रस्त्यावर उतरतील, तेव्हा जिहादींना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे सर्व हिंदूंनी संघटित व्हावे. नजीकच्या काळात हिंदू राष्ट्र नक्कीच निर्माण होईल, असा दावा प्रखर हिंदुत्ववादी नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला.

येथील बसस्थानकावर गुरुवारी हिंदू रक्षा समितीतर्फे बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत नवनीत राणा यांनी हिंदू जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत सबुरीने वागा, असे सांगतानाच, हिंदू जेव्हा रस्त्यावर उतरेल तेव्हा बांगलादेशी अतिरेक्यांबरोबरच जिहादींना पळता भुई थोडी होईल, असे सांगितले.

या सभेला विश्‍व हिंदू परिषदेचे गोवा प्रमुख मोहन आमशेकर तसेच अभय प्रभू व साईदत्त नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेला मोठी उपस्थिती लाभली होती.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदू बांधवांत एक नवचैतन्य संचारले आहे. काँग्रेस केवळ बाबरी मशिदीवर अडकले होते, पण पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिर बांधून ते सर्व हिंदुस्थानींसाठी खुलेही केले. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी संविधानाला कधी महत्त्व दिले नाही आणि आता बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाल्याची तक्रार करत आहेत, मात्र हिंदूबांधवांकडून आणि भाजपच्या नेत्यांकडून कधीही बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होणार नाही, असे ठासून सांगितले.

बांगलादेश हा हिंदुस्थानाचा एक भाग आहे. आपल्या भारत देशाची बांगलादेश ही भूमी आहे, पण तेथील आतंकींनी हिंदूबांधव आणि भगिनींवर अत्याचार केल्यामुळे या लोकांना आता मोकळे सोडता कामा नये असे सांगताना पश्‍चिम बंगालमध्ये घुसखोरी करून बिनधास्त राहण्यासाठी मदत केलेल्या ममता बॅनर्जी यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे नवनीत राणा म्हणाल्या. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सुनील देसाई यांनी केले.

हिंदूंनी एकसंध राहावे

मोहन आमशेकर म्हणाले की, बांगलादेशातील सद्यःस्थिती पाहता आपल्या देशावरही हे संकट येऊ शकते म्हणून आताच जागृत रहायला हवे. जात, पात विसरून सर्व हिंदूंनी एकसंध राहिले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT