Goa Education Dainik Gomantak
गोवा

Goa Education: हिंदी विषय अभ्यासक्रमात कायम, 'जीएससीईआरटी'चे स्पष्टीकरण

goa hindi subject: हिंदी विषय शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आल्याचा समज पूर्णतः चुकीचा आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: हिंदी विषय शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आल्याचा समज पूर्णतः चुकीचा आहे. तो पूर्वीप्रमाणेच अभ्यासक्रमाचा भाग असल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (जीएससीईआरटी) स्पष्ट केले आहे. परिषदेच्या परिपत्रकाच्या आधारे ‘गोमन्तक’ने वृत्त प्रसिद्ध करताच आता ही सारवासारव केली आहे. परिषदेने म्हटले आहे की, ८ जून रोजी जारी करण्यात आलेले परिपत्रक केवळ शैक्षणिक दिनदर्शिकांच्या वितरणासंदर्भात होते.

दिनदर्शिका, वेळापत्रकातील फरकामुळे गैरसमज

शैक्षणिक दिनदर्शिका ही अध्यापन नियोजनासाठी मार्गदर्शक कागदपत्र असते, तर शाळांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे तयार केले जाते. या दोन गोष्टींमध्ये फरक न समजल्याने हिंदी विषयाबाबत गैरसमज निर्माण झाल्याचे परिषदेने नमूद केले आहे.

त्याचा शाळांच्या वेळापत्रकाशी किंवा विषयांच्या अध्यापनाशी कोणताही संबंध नाही. शैक्षणिक दिनदर्शिका ही शिक्षकांना वर्षभराच्या अध्यापनाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक स्वरूपाची कागदपत्रे असतात, तर शाळांचे वेळापत्रक संबंधित शाळांकडून स्वतंत्रपणे तयार केले जाते.

केवळ एखाद्या यादीत किंवा दिनदर्शिकेत विषय दिसला नाही म्हणून तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आला, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे. सहावी, सातवी आणि आठवीसाठी हिंदी विषयाच्या शैक्षणिक दिनदर्शिका उपलब्ध असून त्या परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT