Highlights of Amit Shahs Goa tour  Dainik Gomantak
गोवा

अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यातील ठळक घडामोडी

भाजप आमदारांनी सार्वजनिकरित्या एकमेकांची उणीदुणी काढणे बंद करावे, अशी ताकीद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खास बैठकीत दिली.

दैनिक गोमन्तक

भाजप आमदारांनी सार्वजनिकरित्या एकमेकांची उणीदुणी काढणे बंद करावे, अशी ताकीद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे आमदार व सुकाणू समितीच्या सदस्यांच्या एका खास बैठकीत दिली. भाजपला स्वतःच्या ताकदीवर जिंकून आणण्याचे आवाहन करताना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर युती होणार नसल्याचे संकेत शहा यांनी दिले. आजच्या बैठकीत निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करताना सर्व आमदारांना आणि नेत्यांना कठोर परिश्रम करून पूर्ण क्षमतेने पक्षाला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गोव्यात सत्ता पुन्हा येण्यासाठी 40 मतदारसंघासाठी तयारी करा, असे सांगताना अमित शहा म्हणाले, मागील निवडणुकीत ज्या जागांवर पराभव झाला, तो का झाला हेही समजून घ्या. त्या-त्या जागांची माहिती घ्या, तिथे नेमके काय प्रश्न आहेत हे जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. याशिवाय शक्ती केंद्र आणि बुथस्तरीय कार्यकर्त्यांना सक्रिय करून त्यांच्याकडे विशिष्ट कुटुंबांची जबाबदारी द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या. कार्यकर्त्यांना सक्रिय करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवावी आणि त्यांच्याकडून पाठपुरावा करून घ्यावा. असे झाले तरच भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. हे सर्व करण्याची आणि पाहण्याची जबाबदारी विधिमंडळ सदस्यांची आहे, असेही शहा यांनी सांगितले.

अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यातील ठळक घडामोडी

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दाबोळी येथील नौदलाच्या हंस तळावर वायु सेनेच्या खास विमानाने शुक्रवारी दुपारी आगमन.

  • धारबांदोडा येथे फॉरेन्सिक सायन्स विश्‍‍वविद्यालयाचे भूमिपूजन

  • कुरापती थांबवल्‍या नाहीत, तर पुन्‍हा सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानला इशारा.

  • पर्यटन व्यावसायिकांना 10 लाखांपर्यंत, तर टुरिस्ट गाईडना 1 लाखापर्यंत कर्ज योजना उपलब्ध करण्याची तसेच गोव्यात पर्यटकांची चार्टर विमाने उतरविण्याची ग्वाही.

  • मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या कामाचे भरूभरून कौतुक

  • माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकर्षाने आठवण. पर्रीकरांनी गोव्याची खरी ओळख देशाला करून दिल्याचे गौरवोद्‍गार. ‘वन रँक वन पेन्शन’ पर्रीकर यांनी चालीस लावताना सर्जिकल स्ट्राईकद्वारे देशाची मान ताठ केल्याचे नमूद.

  • ताळागावातील कार्यकर्ता मेळाव्यात पर्रीकरांच्या आठवणीने झाले भावूक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

Goa Spiritual Festival 2026: गोव्यात रंगणार 'स्पिरिच्युअल फेस्टिव्हल', लंडन येथे घोषणा; देवस्थानांची दर्शनयात्रा, तारखा जाणून घ्या..

Goa Beach: "भज मन राधे गोविंदा!" हरमल बीचवर चक्क विदेशी पर्यटकांनी गायले 'भजन'; गोव्याच्या किनाऱ्यावरील व्हिडिओ तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT