Goa Election: अमित शहा, देवेंद्र फडणवीस ठरविणार गोव्यात भाजपची रणनिती

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज तर अमित शहा (Amit Shah) यांचे उद्यापासून गोवा (Goa) दौऱ्यावर तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल, मार्गदर्शन आणि भेटीगाठीवर भर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासुन 3 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासुन 3 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत. Dainik Gomantak

पणजी: गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहत असून सत्ताधारी भाजपने (BJP) ही निवडणूक जास्तच प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणी पक्षाचे निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासुन 3 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत. अमित शहा हे आमदार आणि मंत्री यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत. अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. (Amit Shah, Devendra Fadnavis to decide BJP's strategy in Goa)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासुन 3 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर रणनिती ठरविण्यासाठी अमित शहा गोवा दौऱ्यावर

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांनी या आधीच तयारी सुरु केली आहे. काँग्रेसचे गोवा निवडणुकीचे प्रभारी पी. चिदंबरम गोव्यात ठाण मांडून आहेत. तसेच आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देखील दोन वेळा गोवा दौरा केला आहे. तसेच तृणमूल काँग्रेस देखील गोव्याच्या राजकारणात पाऊल ठेवणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील गोव्यात भेट दिली आहे. सत्ताधारी भाजपचे गोवा निवडणुकीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी देखील मध्यंतरी गोव्यात जाऊन कार्यकर्ते आमदार आणि नेते यांच्या सोबत बैठकी घेतल्या. परंतु आता भाजपचे चाणाक्य म्हणून ओळख असलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा हे गोव्यातील निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी उद्या (14 ऑक्टोबर) ला गोव्यात येणार आहेत. त्यासाठीची पूर्व तयारी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज गोव्यात येणार आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासुन 3 दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्याच्या दौऱ्यावर असून, त्यांचे भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
Goa: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आज गोव्यात आगमन झाले

गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यात उद्या दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा 14 ऑक्टोबरला सकाळी गोव्यात येतील. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष त्यांचे विमानतळावर स्वागत करतील. दुपारी 1 वाजता धारबांदोडा येथील फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन करतील. 2 वाजता ते फोंड्याजवळच्या कुर्टी येथील याच विद्यापीठाच्या इमारतीचे उद्घाटन करतील. 3 वाजता ताळगाव कम्युनिटी हॉलमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर संध्याकाळी खाजगी हॉटेलमध्ये पक्षाचे विधीमंडळातील आमदार, मंत्री त्यांच्याशी बैठक होईल. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करून मार्गदर्शन करतील.यावेळी पक्षातील काही नाराज आमदार, मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी नाराजी दूर करुन पक्षातील संभाव्य फूट टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com