Goa Politics: अंमली पदार्थ विकणारे निवडणुकीचे उमेदवार झालेत !

पैसे देऊन गोव्यातील जनतेची मते विकत घेण्याचा प्रयत्न या उमेदवारांनी चालवला आहे.
Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar
Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : एकेकाळी राज्यात (Goa) अंमली पदार्थ (Medication) विकणारे आता पेडणे (Pernem) मतदारसंघात उमेदवार म्हणून उतरू पाहत आहेत. पैसे देऊन गोव्यातील जनतेची मते विकत घेण्याचा प्रयत्न या उमेदवारांनी चालवला आहे. पण पेडण्यातील जनता आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) आपल्यामागेच ठामपणे उभी राहील, असा विश्वास पेडणे मतदार संघाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी व्यक्त केला आहे.

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar
गोव्यात पुन्हा भाजप सरकारच; अमित शहांना विश्वास

पणजीतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असतांनी त्यांनी असे वक्तव्य केले होते. आमदार या नात्याने गेल्या 20 वर्षांत मी पेडणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला आहे. पेडणेतील जनतेला तथा युवकांना भेडसावत असलेल्या समस्या मी सोडवल्या आहेत. त्यामुळेच पेडणेतील जनतेने माझ्यवर चारवेळा विश्वास टाकत मला आमदार म्हणून निवडून आणले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अंमली पदार्थ विकणारे अनेकजण उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघाचा काय तर स्वत:च्या गावाचाही कधी विकास केलेला नाही, असा जोरदार टोला आजगावकर यांनी नाव न घेता लगावला आहे.

गोव्यातील पेडणे मतदारसंघांत वि विध विकास प्रकल्प आणून त्याचा लाभ स्थानिकांना देण्यात आपण यशस्वी ठरलो आहे अशी ग्वाहीही त्यांनी या कार्यक्रमात स्वत:च दिली . गेल्या २० वर्षांत गोव्यातील मोपा विमानतळ, क्रिकेट स्टेडियम, आयुष हॉस्पिटल, रवींद्र भवन यांसारखे प्रकल्प पेडणे मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. जे प्रकल्प आता मार्गी लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात या प्रकल्पांतून हजारो स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. नव्या उद्योग, व्यवसायांमुळे पेडणेतील जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारून प्रगती होईल, असा विश्वास आजगावकर यांनी व्यक्त केला.

Deputy Chief Minister of Goa: Babu Ajgaonkar
'काँगेस' हाच खरा आमचा विरोधक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यातील खड्ड्यांना सुदिनही जबाबदार

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात रस्त्यावरील खड्यांची समस्या प्रथम स्थानावर आहे. राज्यातील रस्त्यांच्या दुर्दशेला कंत्राटदार जबाबदार आहेत. या रस्त्यांची कामे करणारे एमव्हीआरसारखे कंत्राटदार माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नेमले होते. त्यामुळे गोव्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांना सुदिनही जबाबदार आहेत, असा आरोप मंत्री आजगावकर यांनी केला. मात्र आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जातीने यात लक्ष घातल्यामुळे 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे निश्चितपणे बुजवले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com