Sanquelim Municipal Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Election: साखळी पालिकेसाठी ‘हाय वोल्टेज’ लढत

गोमन्तक डिजिटल टीम

Sanquelim Municipal Election राज्यात ‘हाय वोल्टेज’ म्‍हणून सर्वांचे लक्ष लागलेल्‍या साखळी नगरपालिकेसाठी उद्या दि. 5 मे रोजी होणाऱ्या बहुचर्चित निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहन कासकर व उपनिवडणूक अधिकारी तथा मामलेदार राजाराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवडणूक निरीक्षक प्रसाद वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदानकेंद्रे सज्ज करण्यात आलेली आहेत. कडक ऊन व उकाड्याचा त्रास मतदारांना होऊ नये यासाठी खास मंडप उभारण्यात आलेले आहेत.

प्रभाग १ मध्ये एकूण ७३७ मतदार असून ३६८ पुरूष व ३६९ महिला मतदार आहेत. या प्रभागात भाजपचे यशवंत माडकर, ‘टुगेदर फॉर साखळी’च्या कुंदा माडकर, संतोष हरवळकर व गितेश माडकर हे उमेदवार आहेत.

त्यापैकी गितेश माडकर यांनी भाजपचे यशवंत माडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रभाग २ मध्ये ८१६ मतदार असून ४०५ पुरूष तर ४११ महिला मतदार आहेत. या प्रभागात भाजपच्या निकिता नाईक, टुगेदर फॉर साखळीच्या इशा सगलानी, प्रसादिनी कुडणेकर, ज्योती गोसावी व नुरजहा अल्ताफ खान हे उमेदवार रिंगणात आहेत.

पैकी ज्योती गोसावी यांनी भाजपच्या निकिता नाईक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रभाग ३ मध्ये ६५३ मतदार असून ३१३ पुरूष व ३४० महिला मतदार आहेत. या प्रभागात भाजपच्या सिद्धी प्रभू व टुगेदर फॉर साखळीच्या सुनीता वेरेकर या उमेदवार आहेत.

प्रभाग ४ मध्ये ८५८ मतदार असून ४४३ पुरूष व ४१४ महिला मतदार आहेत. यात भाजपच्या रश्मी देसाई, टुगेदर फॉर साखळीचे धर्मेश सगलानी व ओमकार फुलारी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग ५ मधून ‘टुगेदर फॉर साखळी’चे प्रवीण ब्लेगन बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग ६ मध्ये ७७७ मतदार असून ३७६ पुरूष तर ४०१ महिला मतदार आहेत. यात भाजपच्या विनंती पार्सेकर, टुगेदर फॉर साखळीच्या डॉ. सरोज प्रकाश देसाई, हसन मारियाकुट्टी शफी, संचिता सचिन सालेलकर हे उमेदवार आहेत.

प्रभाग ७ मध्ये एकूण ४६७ मतदार असून २२४ पुरूष व २४३ महिला मतदार आहेत. यात भाजपचे नगरसेवक ब्रह्मानंद देसाई, टुगेदर फॉर साखळीचे संपतराव देसाई, विनोद पेडणेकर, राजेंद्र पोसनाईक हे उमेदवार आहेत.

प्रभाग ८ मध्ये भाजप पॅनलचे रियाझ खान बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. प्रभाग ९ मध्ये ७०७ मतदार आहेत. ३२९ पुरूष तर ३७८ महिला मतदार आहेत. यात भाजपचे आनंद काणेकर, टुगेदर फॉर साखळीच्या भाग्यश्री ब्लेगन हे उमेदवार आहेत.

प्रभाग १० मध्ये ६२९ मतदार असून ३०६ पुरूष तर ३२३ महिला मतदार आहेत. यात भाजपचे दयानंद बोर्येकर व टुगेदर फॉर साखळीचे राजेंद्र आमेशकर हे उमेदवार आहेत. प्रभाग ११ मध्ये ६३९ मतदार असून ३१६ पुरूष तर ३२३ महिला मतदार आहेत.

यात भाजपच्या दीपा जल्मी व टुगेदर फॉर साखळीच्या रश्मी घाडी या उमेदवार आहेत. तर, प्रभाग १२ मध्ये ६५० मतदार आहेत. त्‍यात ३११ पुरूष व ३३९ महिला मतदारांचा समावेश आहे. त्‍यात भाजपच्या अंजना अर्जुन कामत, टुगेदर फॉर साखळीच्या आश्विनी नीलेश कामत व प्रज्वला मिलिंद नाईक हे उमेदवार रिंगणात आहेत.

10 प्रभागांतून 31 उमेदवार रिंगणात; 2 बिनविरोध

साखळी पालिका निवडणुकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झालेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील ही पालिका असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ही निवडणूक भाजप विरुद्ध ‘टुगेदर फॉर साखळी’ या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली असली तरी प्रचारादरम्यान समोर आलेल्या काही गोष्टी लक्षात घेता खरी परीक्षा ही साखळीवासीयांचीच आहे.

निवडणूक एकूण १२ प्रभागांसाठी असली तरी त्यातील प्रभाग क्र. ५ व ८ मधून बिनविरोध नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे १० प्रभागांसाठी मतदान होणार असून ३१ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ६९३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३३९१ पुरूष तर ३५४१ महिला मतदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT