Court Dainik Gomantak
गोवा

20 वर्षापूर्वी कंपनीत पतीचा मृत्यू, नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ, न्यायालयाने फ्लॅट जप्तीचा आदेश देताच कंपनीला जाग

2004 मध्ये कामगाराच्या पत्नीने आयोगाकडे नुकसान भरपाईसाठी कंपनीविरुद्ध अर्ज केला होता.

दैनिक गोमन्तक

Goa News: कामगाराच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कामगार आयुक्ताने देऊनही ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या श्रीकृष्ण ओअर कॅरियर्सच्या संचालकांचे मुरगावातील दोन फ्लॅट जप्त करण्याचा दणका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला होता.

या आदेशानंतर त्वरित दुसऱ्या दिवशीच या कंपनीचे संचालक ऋषी नायर यांनी व्याजासह नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा केल्याने गोवा खंडपीठाने फ्लॅट जप्तीचा दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आदेश रद्द करून याचिका निकालात काढली.

श्रीकृष्ण ओअर कॅरियर्स या कंपनीत कामाला असलेल्या याचिकादार दीपाली ऊर्फ सुधा गोवेकर हिच्या पतीचा 2004 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. यासंदर्भात तिने कामगार आयोगाकडे नुकसान भरपाईसाठी कंपनीविरुद्ध अर्ज केला होता.

आयोगाने कंपनीला 3 लाख 19 हजार 600 रुपये देण्याचा आदेश 2015 रोजी दिला होता. मात्र ही रक्कम देण्यास कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याने यासंदर्भात तिने मुलांसह उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती.

या नुकसान भरपाईसाठीची मागणी करूनही त्याला दाद दिली जात नाही. आठ वर्षे उलटून गेल्याने ही रक्कम व्याजासह 10 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कंपनीच्या संचालकांकडून ही रक्कम देण्यास टोलवाटोलवी केली जात असल्याचे याचिकेत नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT