Heritage Figueredo Mansion in Loutolim Goa Dainik Gomantak
गोवा

Figueredo Mansion: ताजमहालच्या आधी उभारलेली, 435 वर्षांचा इतिहास सांगणारी दक्षिण गोव्यातील भव्य हवेली; फिगेरेदो मॅन्शन

Heritage Figueredo Mansion in Loutolim Goa: या मालमत्तेची सध्या देखभाल करणारे पेद्रो पोर्तुगालमध्येच लहानाचे मोठे झाले. मात्र या वारसा घराची जबाबदारी घेण्यासाठी ते गोव्यात परतले.

Sameer Panditrao

रॉक्सान डिसिल्वा 

या भव्य प्रासादासमोर जेव्हा जेव्हा तुम्ही उभे असता तेव्हा साक्षात ४३५ वर्षांचा इतिहास तुमच्या समोर उभा असतो. दक्षिण गोव्यातील लोटली या सुंदर गावातील ‘फिगेरेदो मॅन्शन’ नावाची ही हवेली एक वास्तुशिल्परूपी दागिना आहे. गोव्याच्या भूतकाळाची ही एक समृद्ध सांस्कृतिक खिडकी आहे.

उंच दरवाजे आणि उंच छत आणि समोर भातशेतीचा सुंदर नजारा घेऊन असलेले ही हवेली इतिहासकालीन शिलेदाराप्रमाणे भासते. १७व्या आणि १८व्या शतकात जेव्हा गोवा हे व्यापाराचे केंद्र होते, तेव्हाच्या ऐश्वर्याची खूण ही हवेली सांगते.‌ या हवेलीचा प्रत्येक कोपरा एक कथा घेऊन उभा आहे.

बाकी या मालमत्तेचे दोन भाग आहेत- जुने घर आणि नवीन घर. जुने मूळ घर १५९० मध्ये‌ बांधले गेले. पोडियार या हिंदू ब्राह्मण कुटुंबाने ते बांधले होते.‌ प्रसिद्ध ताजमहाल देखील त्याकाळी बांधला गेला नव्हता.‌

पोडियार या हिंदू ब्राह्मण कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. धर्मांतर करून फिगेरेदो हे नाव स्वीकारलेल्या कुटुंबासाठी या हवेलीची रचना जवळच असलेल्या राशोल सेमिनरीतील जेजुइट धर्मगुरूंनी केली. तेव्हापासून हा वारसा फिगेरेदो कुटुंबीय चालवत आहेत. 

या भव्य घराच्या अंतर्भागाला शोभेल असे नैसर्गिक सौंदर्य घराच्या सभोवताली आहे. नारळाची बाग आणि भात शेती यांनी एक हिरगार कवच या हवेलीला प्रदान केले आहे. अठराव्या शतकात जेव्हा हे कुटुंब राजकीयदृष्ट्या प्रबळ बनले तेव्हा त्या काळात जुन्या घराला सुसंगत बनेल अशा दृष्टीने या घराचा विस्तार करण्यात आला, जो आज ‘नवीन घर’ घडून ओळखला जातो.

२०१६मध्ये या घराच्या जुन्या भागाचे नूतनीकरण केले गेले ज्यात आज 'होम स्टे' सुविधा आहे. विशेष म्हणजे या भागातील सुंदररित्या रचना करण्यात आलेल्या या ९ खोल्यांना गोव्याच्या मुक्तीनंतर या घराची देखभाल फिगेरेदो कुटुंबातील ज्या ज्या स्त्रियांनी समर्थपणे केली त्यांची नावे देण्यात आली आहेत. 

या मालमत्तेची सध्या देखभाल करणारे पेद्रो पोर्तुगालमध्येच लहानाचे मोठे झाले. मात्र या वारसा घराची जबाबदारी घेण्यासाठी ते गोव्यात परतले. हवेलीचा एक भाग खाजगी संग्रहालय म्हणून लोकांसाठी खुला आहे.

माफक शुल्क अदा करून या भागाची मार्गदर्शित टूर मिळवता येते. बेल्जियन क्रिस्टल झुंबर, २४ कॅरेट सोन्याची भांडी, ऑईस्टर शिंपल्यांच्या खिडक्या, बर्मी सागवानी लाकडाची फरशी, सुंदर कोरीव काम असलेले रोजवुड फर्निचर इत्यादी तेथील वस्तू थक्क करतात. 

तुम्ही इतिहासप्रेमी किंवा स्थापत्यशास्त्राचे प्रेमी किंवा काहीतरी वेगळे पाहण्याची इच्छा असणारे  असाल तर फिगेरेदो मॅन्शन आपल्यासाठी एक यादगार अनुभव असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT