Placuna Placenta: खिडक्यांसाठी शिंपल्यांचे कवच वापरण्याची पोर्तुगीज संकल्पना ‘प्लॅकुना प्लेसेंटा’

Portuguese style windows Goa: ‘प्लॅकुना प्लेसेंटा’ असे हे नावअसलेल्या या शिंपल्या, खिडक्यांमध्ये त्यांचा वापर होत असल्यामुळे विंडोपेन ऑईस्टर; म्हणूनही ओळखल्या जात असत.
Portuguese style windows Goa
Placuna Placenta GoaDainik Gomantak
Published on
Updated on

शिंपल्यांची रचना बसलेल्या जुन्या घरांच्या खिडक्या  गोव्यात अजूनही तुम्हाला दिसतील.(मध्यंतरी अशा शिंपल्यांपासून विविध हस्तकला वस्तूही तयार व्हायच्या.) मात्र आता या अशा शिंपल्या गोळा करण्यावर आणि त्यांच्या  विक्रीवर बंदी घातली गेली असल्यामुळे अशा प्रकारच्या खिडक्यांच्या नवीन रचना आपल्याला आढळून येणार नाहीत काल 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन साजरा झाला.

शिंपल्यांचा वापर  करून बनवल्या गेलेल्या या खिडक्या देखील आपल्या वारशाचा एक भाग आहे.‌ ‘प्लॅकुना प्लेसेंटा’ असे हे नावअसलेल्या या शिंपल्या, खिडक्यांमध्ये त्यांचा वापर होत असल्यामुळे विंडोपेन ऑईस्टर; म्हणूनही ओळखल्या जात असत. शिंपल्यांचे हे टिकाऊ कवच त्याच्या अर्धपारदर्शकता या गुणामुळे हजारो वर्षांपासून काचेला पर्याय म्हणून वापरले जात असे. 

गोव्यात उच्च जातीच्या कॅथलिक कुटुंबाच्या जुन्या घरांच्या खिडक्यांमध्ये या शिंपल्यांचा वापर एक सामान्य बाब होती. गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपच्या हेता पंडित सांगतात की खिडक्यांसाठी शिंपल्यांचे हे कवच वापरण्याची संकल्पना पोर्तुगीजांच्या माध्यमातून गोव्यात आली; जेव्हा काही कुटुंबानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तेव्हा त्यांच्या घरांचेही धर्मांतर झाले. पूर्वी घरांच्या भिंतीवर उंचावर असलेल्या खिडक्या आता डोळ्यांच्या पातळीवर आल्या.

या खिडक्या झाकण्यासाठी मग काहीतरी हवे होते. त्याकाळी काच फार महाग होती, जी 1890 मध्ये गोव्यात आली. त्यामुळे खिडक्यांवर बसवण्यासाठी या शिंपल्यांचा वापर होऊ लागला.

खिडक्यांमधील विशिष्ट रचनेच्या जाळीत विविध रंग परावर्तित करणाऱ्या या शिंपल्या बसवल्या जात असत. बाहेरच्या नजरांपासून वाचताना या शिंपल्या उष्णतेला टाळून खोलीत मंद प्रकाशयेऊ द्यायच्या. त्या सहज न तुटणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या होत्या. स्थानिक भाषेत त्यांना ‘कॅपिज’ किंवा ‘करेपा’ या नावानेही ओळखले जाते.

Portuguese style windows Goa
Tennis De Gasper Dias: पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याच्या प्रवासाचा साक्षीदार असलेला, 100 वर्षे पूर्ण केलेला क्लब

1616 मधील द वोयेज ऑफ फ्रेंकॉईस पिरार्डऑफ लावल;मध्ये गोव्यातील खिडक्यांमध्ये बसवलेल्या या शिंपल्यांचा उल्लेख आहे. पुढील काळात काच सहज उपलब्ध होत गेल्यानंतर अनेक खिडक्यांमध्ये काचेचा उपयोग सुरू झाला.

गोव्यात जुवारी नदीच्या खाडीच्या मुखापाशी हे शिंपले एकेकाळी मुबलक सापडत. गोलाकार असलेले हे शिंपले सपाट, गुळगुळीत, तकतकीत असतात. या शिंपल्यांचा आकार 18 ते 131 मिलिमीटरपर्यंत असू शकतो. या प्रजातीचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पोटात लहान मोती तयार होऊ शकतात, जे मोती प्रामुख्याने औषध उद्योगात वापरले जातात.

Portuguese style windows Goa
Athaide Library Mapusa: पोर्तुगीज राजवटीत स्थापन झालेले, म्हापशातील जुने सार्वजनिक ग्रंथालय 'अथाईड' होणार सुरु

शिंपल्यांमध्ये  होणाऱ्या या मोती निर्मितीची टक्केवारी गोव्यात सुमारे 35 टक्के आहे जीभारतातील इतर प्रदेशात मधील शिंपल्यांच्या तुलनेत अधिक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रजातीचे शिंपले एक कार्यक्षम बायोक्युम्युलेटर (असे जीव जे प्रदूषक पदार्थ दूर करण्यापेक्षा त्यांच्या उतीमध्ये वेगाने जमा करतात) म्हणून ओळखले जातात आणि ते किनारपट्टीच्या पर्यावरणीय निरीक्षणासाठी उपयोगी ठरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com