Houses Of Goa: गोव्यातील वास्तुकलेची उत्क्रांती दाखवणारी जागा; हाऊजेस ऑफ गोवा

Goan Houses: गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांचे कौतुक होताना गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्थापत्य आणि इतिहासाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
Traditional Goan houses
Traditional Goan housesDainik Gomantak
Published on
Updated on

रॉक्सन डिसिल्वा

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांचे कौतुक होताना गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्थापत्य आणि इतिहासाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. उत्तर गोव्यातील साल्वादोर दो मुंद येथील ‘हाऊजेस ऑफ गोवा’ला भेट देऊन गोव्याचा भूतकाळ आपण काही अंशी नक्कीच समजून घेऊ शकतो. हे संग्रहालय गोव्यातील घरांमध्ये कालांतरात जो बदल घडत गेला त्याची आकर्षक कल्पना देते त्यामुळे इतिहास आणि वास्तुकला अभ्यासकांसाठी हे एक आदर्श ठिकाण बनले आहे. केवळ तिथे असलेल्या ऐतिहासिक संग्रहामुळे ‘हाऊजेस ऑफ गोवा’ वेगळे ठरत नाही तर त्याची अनोखी रचना देखील या संग्रहालयाला अनोखे बनवते. 

वास्तुविशारद जेरार्ड डी कुन्हा यांची दूरदर्शी प्रेरणा या एकमेवाद्वितीय संग्रहालयामागे आहे. गोव्याच्या पारंपारिक घरांचा वास्तुशिल्पीय वेगळेपणा जपण्याच्या उत्कटतेने त्यांना स्थानिक वास्तुकलेची उत्क्रांती दाखवणारी ही जागा निर्माण करण्यास प्रवृत्त केले.

गोमंतकीय घरांवर असलेला पोर्तुगीज प्रभाव तसेच त्यांचे आधुनिक रूपांतर आपल्याला या संग्रहालयात अनुभवता येते. या संग्रहालयामागची प्रेरणा उलगडून सांगताना जेरार्ड म्हणतात, ‘गोमंतकीय घरांच्या वैशिष्ट्यांची नोंद घेणे आणि त्याचे महत्त्व समजण्यास चुकलेल्यांना मदत करणे ते एक वास्तुविशारद या नात्याने माझे कर्तव्य होते.’

या संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर आपल्याला विविध प्रकारच्या गोमंतकीय घरांची वैशिष्ट्ये आणि बांधकाम शैली दर्शवणारे तपशीलवार नमुने दिसतील. तशा प्रकारची काही घरे आजही गोव्यात अस्तित्वात आहेत. दुसऱ्या मजल्यावर गोमंतकीय घरांच्या बांधकामाचे अधिक खोलवर तपशील आपल्याला दिसतील. ज्यामुळे ‘गोमंतकीय’ अशी ओळख घरांना मिळते ते क्लिष्ट रचना असलेले खांब तसेच फरशा, दारे आणि खिडक्या यामधील कारागिरी इथे जवळून अभ्यासता येते. 

संग्रहालयाचा पोटमाळा गोव्याच्या वास्तु उत्क्रांतीचे सार सादर करतो. गोव्याच्या वास्तुशिल्पीय लँडस्केपला आकार देणाऱ्या संस्कृती आणि प्रभावाचे मिश्रण या मजल्यावर सुंदरपणे मांडले गेले आहे. जेरार्ड सांगतात, ‘पोर्तुगीजांमुळे या प्रकारची वास्तुकला गोव्यात आली आणि कालांतराने ती स्थानिक प्रभावांमध्ये विलीन झाली आणि तिने ‘गोमंतकीय घरे’ अशी व्याख्या बनवणारी एक अनोखी संकरित शैली तयार केली.’

Traditional Goan houses
Goa Tourism: सफर गोव्याची! वायंगण शेतीला पाणी देत दूधसागर, खांडेपार नदीत विलीन होणारा निरंकालचा ओहोळ

गोव्याच्या भूतकाळाचे सार जणू या संग्रहालयात जपले गेले आहे. या संग्रहालयासाठी जेरार्डने साहित्य कसे गोळा केले हा प्रश्न हे संग्रहालय पाहताना मनात येतो. त्याचे उत्तर जेरार्ड देतात, ‘गोव्यातील अनेक पारंपारिक घरे विविध कारणांनी पाडली जाताना मी बरेच साहित्य तिथून गोळा केले आहे. हे साहित्य मी माझ्या वास्तू रचनांमध्ये तसेच या संग्रहालयात समाविष्ट केले.’

या वास्तुसंग्रहालयाची बाह्यरचना देखील आतील भागाइतकीच वैचित्र्यपूर्ण आहे.‌ साल्वादोर दा मुंद मधील तोर्डा येथील रस्त्यावरील एका यु आकाराच्या वळणावर बांधलेल्या या संग्रहालयाची रचना त्रिकोणी आणि जहाजाच्या आकारासारखी आहे.

Traditional Goan houses
Goa Housing Board: खुशखबर! 'गोव्यात' मिळणार 'सरकारी' दराने भूखंड; जाणून घ्या संपूर्ण माहिती

‘हे स्थापत्य गोव्यातील घरांचा वारसा सांगत, कालप्रवास करणाऱ्या एका जहाजाची कल्पना प्रतिबिंबित करते.’असा खुलासा जेरार्ड या संग्रहालयाच्या रचनेसंबंधाने करतात. 

गोव्याच्या स्थापत्य कलेविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक असलेल्यांसाठी ‘हाऊजेस ऑफ गोवा’ हे एक नक्कीच अनमोल माध्यम आहे. या संग्रहालयाच्या जवळचपासच जेरार्डने रचना केलेली शाळा- ‘शिक्षा निकेतन’ व ‘मारियो गॅलरी’ हे कलादालन आहे. या दोन्ही वास्तूरचनाही जेरार्डच्या  प्रतिभेची साक्ष देणाऱ्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com