Goa Flood
Goa Flood 
गोवा

Goa Floods: पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरुच

दैनिक गोमन्तक

दाबोळी: रेव्होल्युशनरी गोवन्स (Revolutionary Goans) च्या वास्कोतील कार्यकर्त्यांनी सत्तरी वाळपईत पूरग्रस्त झालेल्या भागांना भेट देऊन आवश्यक मदत पोचवण्याचे काम सुरू केले असून, जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत मदत कार्य चालूच राहणार असल्याचे पोगोचे नेतृत्व करणारे गौरिष बोरकर यांनी सांगितले. (Help is being given to the flood affected areas)

गेले पंधरा दिवस सतत पडलेल्या पावसामुळे राज्यात कित्येक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्याने यात घरांची पडझड होऊन लोकांना मोठ्या प्रमाणात वित्तहानीला सामोरे जावे लागले. यात बहुतेक जणांचा संसार उध्वस्त झालेला पाहण्यात आला. दरम्यान याची दखल घेऊन मुरगाव तालुक्यातील रेव्होल्युशनरी गोवन्स पोगोच्या वास्को, दाबोळी, सांकवळ कासावली व इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सत्तरी वाळपई येथे ग्रामीण भागात जाऊन तेथील पूरग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व त्यांचा उध्वस्त झालेला संसार उभा करण्याचा त्यांना आश्वासन दिले.

रेव्होल्युशनरी गोवन्स पोगोच्या कार्यकर्त्यांनी सत्तरी येथे या ग्रामीण भागांना भेट दिली असता, पुराचे पाणी ओसरत असताना, पुराने केलेली हानी लक्षात येत आहे. अनेकांची घरे पडली कपडे वाहून गेले तर अनेकांची खाण्यापिण्याची ही गैरसोय झाली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तके व इतर दस्तावेज पाण्यात गहाळ झाल्याने, त्यातील संपूर्ण मजकूर पुसून गेल्याने, त्यांचे पुरावे नष्ट झाल्याने, त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे.

पोगो कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन मदत कार्य हाती घेतले आहे. पूरग्रस्तांना उभारी देण्यासाठी त्यांना आवश्यक कपडे, अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत असे पोगो चे कार्यकर्ते गौरिष बोरकर यांनी सांगितले. पुरामुळे हानी पोहोचलेल्या भागात मदत पोहोचवण्यासाठी दररोज भेट दिली जात आहे. तेथील लोकांना कशाची आवश्यकता आहे याचा अभ्यास केला. असाच फोंडा व इतर पूरग्रस्त भागात जाऊन विविध पथके स्थापन करून त्यांच्या मार्फत विविध गावात शिधा वाटपाचे वितरण करण्यात आल्याचे बोरकर म्हणाले. बहुतांश घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. सरकारची मदत अध्याप त्यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याचे बोरकर यांनी सांगितले.

पुरामुळे हानी सोसलेल्याना, त्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. ते अद्याप हाल-अपेष्टा सहन करून आपले जीवन कंठीत असून, त्यांना शासनाची मदत मिळालेली नाही. गोमंतकीय एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. सरकारची नुसती आश्वासनांचा महापूर बाकी सगळे मदतकार्य राहिले मागे. सरकारने लोकांची आणखी जास्त हवेला न करता त्यांना त्यांच्या उध्वस्त झालेला संसार उभा करून द्यावा अशी मागणी यावेळी गौरी बोरकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

SCROLL FOR NEXT