Heavy truck accident at closed hotel near junction at Khandepar Dainik Gomantak
गोवा

ओपा-खांडेपारातील हॉटेलात घुसला मालवाहू ट्रक!

अपघातापूर्वी हे विद्यार्थी बस आल्याने तेथून निघून गेल्यामुळे अनर्थ टळला.

दैनिक गोमन्तक

फोंडा: ओपा - खांडेपार येथील जंक्शनजवळील बंद हॉटेलात मालवाहू अवजड ट्रक घुसल्याने या दुकानाची मोठी हानी झाली. यावेळी पार्किंग केलेली दुचाकी मोटारसायकलही ट्रकच्या खाली आल्याने या दुचाकीचीही मोडतोड झाली. सुदैवाने यावेळी तेथे कुणीच नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, ट्रक, दुकान व दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

हा अपघात काल शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला. बाराचाकी अवजड मालवाहू ट्रक फोंड्याहून बेळगाव मार्गे जाताना हा अपघात घडला. या तिठ्यावर बससाठी थांबलेले हायस्कूलचे चार विद्यार्थी सुदैवाने वाचले. अपघातापूर्वी हे विद्यार्थी बस आल्याने तेथून निघून गेल्यामुळे अनर्थ टळला.

या अवजड मालवाहू ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण गेल्याने ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलात घुसला. हे हॉटेल सध्या बंद असल्याने तसेच दुकानाच्या बाजूने ट्रक येत असल्याचे पाहून तेथे असलेल्या लोकांनी पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, सरकारने उड्डाणपुलाच्या जोडरस्‍त्याचे काम मार्गी लावून हा महामार्ग पूर्ण करावा, येत्या चार महिन्यात हे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

खांडेपार येथील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम पूर्ण केल्यास वाहतुकीचा ताण कमी होईल.

- संदीप खांडेपारकर, माजी सरपंच, कुर्टी - खांडेपार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला! माजी पंतप्रधान देउबा आणि पत्नीला आंदोलकांची मारहाण; रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल!

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

SCROLL FOR NEXT