काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर ‘तृणमूल’च्या गोटात ‘ट्रोजन’

ट्रोजन डिमेलो यांनी ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत भाजपला मुळापासून उखडून काढण्यासाठी केवळ तृणमूल काँग्रेसचा पर्याय असल्याचे म्हटले.
Trajano Dmello joined trinamool congress in goa
Trajano Dmello joined trinamool congress in goa Dainik Gomantak

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या (Goa assemblt election) पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराचे वारे जोरात असून, दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमधून (Congress) हकालपट्टी केलेले माजी आमदार ट्रोजन डिमेलो काल तृणमूलच्या (TMC) गोटात सामील झाले. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझीन फालेरो (luizinho faleiro)आणि गोवा प्रभारी महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी त्यांना शाल, झेंडा देऊन रीतसर त्यांना पक्षात सामावून घेतले.

पक्ष प्रवेश कार्यक्रमाला काँग्रेसचे उत्तर गोवा उपाध्यक्ष गौतम मांद्रेकर, भाजपचे शिरगावचे कार्यकर्ते संमेश गावकर यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला. ट्रोजन डिमेलो यांनी ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत भाजपला मुळापासून उखडून काढण्यासाठी केवळ तृणमूल काँग्रेसचा पर्याय असल्याचे म्हटले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात्मक बाबींवर टीका करत तृणमूल काँग्रेसच्या प्रभारी खासदार महुआ मोईत्रा यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. राज्यातील सरकार भ्रष्ट असून, या सरकारला हाकलण्यासाठी केवळ तृणमूल काँग्रेसचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

Trajano Dmello joined trinamool congress in goa
शिवसेना गोव्यात लढवणार 22 जागा

बोरीतील दोनशेहून अधिक कार्यकर्ते दाखल

फोंडा बोरी येथील दोनशेहून अधिक कार्यकर्ते तुकाराम बोरकर यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलमध्ये दाखल झाले. पक्षाचे प्रभारी खासदार महुआ मोईत्रा, लहू मामलेदर, जयदीप शिरोडकर यावेळी उपस्थित होते. तृणमूलमध्ये दिवसेंदिवस इतर पक्षांचे कार्यकर्ते दाखल होत असल्याने पक्षांतराच्या घडामोडी घडत आहेत.

Trajano Dmello joined trinamool congress in goa
'जेपी नड्डा गोव्यातील जनतेला मूर्ख बनवत आहेत'; मोईत्रा यांचा हल्लाबोल

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी तृणमूल हे अत्यंत चांगले व्यासपीठ आहे. आपण निवडणुकीसाठी उभारणार नाही; मात्र लोकशाहीची पुनर्बांधणी आणि चांगल्या प्रशासनासाठी नवमुक्तीची चळवळ गरजेचे आहे. आणि ही चळवळ तृणमूलपासून सुरू झाली आहे.

- ट्रोजन डिमेलो माजी आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com