Tree Collapsed On House Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: कुठे दरड कोसळली, कुठे झाड पडले तर काही ठिकाणी घरात शिरले पाणी; गोव्यात दुसऱ्या दिवशीही धुँवाधार पाऊस

Rain In Goa: पुढील ३-४ दिवस गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात मंगळवारपासून (२० मे) धुव्वाधार पाऊस कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात दरड कोसळणे, घरात पाणी शिरणे तसेच झाडे कोसळून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान घडण्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाची तीव्रता पाहता गोवा वेधशाळेने बुधवारी दुपारी १ वा. राज्यात रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो पावसात घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पेडणे, मोरजी, सत्तरी, फोंडा, डिचोली मोठ्या प्रमाणात झाडाची पडझड झाली असून फोंडा, सोनारभाटात-रेईशमागूस येथे घरे जमीन दोस्त झाले आहे.

पणजीत झाड कोसळले!

पणजीतील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेले भले मोठे झाड रस्त्यावर कोसळले. झाड कोसळल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु या झाडाखाली ठेवण्यात आलेल्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाडे आहे. त्यातील एका नॉन गियर दुचाकीचे दुरवस्था झाली.

राज्यात कोठे काय घडले?

१) कासारवर्णे-पेडणे येथे वडाचे झाड कोसळून चारचाकीचे जबर नुकसान.

२) उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी आंब्याचे झाड कोसळून दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

३) सडा येथे रस्त्याशेजारील दरड कोसळली. गेल्यावर्षी देखील याच ठिकाणी दरड कोसळली होती.

४) गिरी येथे घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात ४ नुकसान.

५) बागा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेस्टॉरंटवर आंब्याचे झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान.

महत्त्वाची सूचना

१) अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीजवळ वातावरणात चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

२) शुक्रवारी (२३ मे) सकाळपर्यंत या क्षेत्राची तीव्रता वाढण्याचा अंदाज.

३) पुढील ३-४ दिवस गोव्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पाऊस.

४) या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, किनारपट्टी आणि घाट क्षेत्रात पर्यटन टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT