Corona In Goa: वास्कोत आढळला कोरोनाचा रुग्ण? मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू

Covid -19 In Goa: केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत.
Corona In Goa
Corona Cases In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईत ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गोव्यात वास्कोतही कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे.

तो अन्य राज्यांतून गोव्यात दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाकडून त्याची पुष्टी मिळणे बाकी आहे. देशात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २५७ वर पोहोचली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.

तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाशी संबंधित आजार होता.

Corona In Goa
IndiGo Travel Advisory: फ्लाईट रद्दही होऊ शकते! इंडिगोकडून गोवा प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना

सिंगापूरमध्ये 14 हजार रुग्ण

आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. १ ते १९ मेदरम्यान सिंगापूरमध्ये ३००० रुग्ण आढळले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या ११,१०० होती. येथे प्रकरणांमध्ये २८% वाढ झाली असून १४ हजार रुग्ण असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com