Sattari Flood  Canava, Dainik Gomantak
गोवा

Sattari News: सत्तरीत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता?

Goa Weather Update: नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार व संततधार पावसामुळे सत्तरी तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून रस्त्यावर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. असाच जर पाऊस सुरू राहिला, तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या घाटमाथ्यावरसुध्दा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने म्हादई, रगाडा, वेळुस तसेच इतर छोट्या नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत. सोनाळ - सत्तरी येथे दरवर्षी म्हादई नदीला पूर येऊन रस्ते पाण्याखाली जातात. आताही तीच स्थिती निर्माण झाली आहे.

वाळपई भागातील वेळुस नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाढू लागले आहे. वेळुस - ठाणे मार्गावर अनेक ठिकाणी गटारे भरून रस्त्यावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी निचरा नसल्याने रस्त्यावरच पाणी साचून रहाते. असाच जर पाऊस पडत राहीला, तर रस्त्यावर पाणी भरून वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. कोपार्डे - सत्तरी येथेही रस्त्यावर पाणी साचले आहे.

वेळुस-नगरगाव मार्गावर भूमिगत वीजवाहिनी घालण्यासाठी खोदलेल्या चरामुळे रस्ता चिखलमय झाला झाला आहे. तसेच वाळपई - ठाणे मार्गावरही भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेले खड्डे धोकादायक बनले आहेत.

वीज खात्याला १० लाखांचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका बसून वीज खात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे १० लाखांच्या आसपास नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वीज तारांवर झाडे पडून वीज तारा तुटणे, वीज खांबाचे नुकसान होणे आदी प्रकार सातत्याने घडत आहे. त्यामुळे वीज खात्याचे मोठे नुकसान झाले आहे.

झाडांची पडझड सुरूच

कुडशे - सत्तरी येथी रस्त्यावर व वीज तारांवर आज दुपारी झाड पडून वीजतारांचे मोठे नुकसान झाले. तसेच केरी - सत्तरी येथील घोटेली क्रमांक १ येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळील रस्त्यावर व वीज तारांवर झाड पडले. केरी - सत्तरी येथे स्टेट बॅंकेजवळ शेंगलाचे झाड घरावर पडून नुकसान झाले. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सर्व ठिकाणचे अडथळे दूर केले. अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश नार्वेकर, रामा नाईक, सुधाकर गावकर, कृष्णा नाईक आदी जवानांनी मदतकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT