Sattari Flood  Dainik Gomantak
गोवा

Ragada River: रगाडा नदीला उधाण, रस्ते पाण्याखाली, लोकांची गैरसोय

Goa Rain: साकोर्डा पंचायत क्षेत्राबरबरोच गुळेली पंचायत क्षेत्रातील काही ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पडणाऱ्या पावसामुळे सर्व नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. सत्तरी व धारबांदोडा तालुक्यातून वाहणारी रगाडा नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे साकोर्डा पंचायत क्षेत्राबरबरोच गुळेली पंचायत क्षेत्रातील काही ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रगाडा नदीच्या किनाऱ्यावर असलेला मुरमुणे-मेळावली रस्ता गुरुवारी दुपारपासून पाण्याखाली गेल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. हा रस्ता पाण्याखाली गेल्याने मेळावली भागातील मुरमणे, शेळ, धडा, मैंगीणे, पैकुळ आदी भागातील लोकांची गैरसोय झाली. त्यामुळे या भागातील लोकांना घर गाठण्यासाठी एक तर गवाणे-मैंगीणे मार्गाचा किंवा बोंडला अभयारण्याच्या रस्त्याचा वापर करावा लागला.

गेल्या काही वर्षांपासून रगाडा नदीला पूर आला की हा रस्ता पाण्याखाली जाणे हे आता नित्याचेच झाले आहे. यावर्षीही आता दुसऱ्या वेळी हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे या भागातून गुळेलीमार्गे कामाला जाणारे नागरिक व गुळेली माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थी वर्गाचे हाल होत आहेत. मोठा पावसात घरातून बाहेर पडणे दुरापास्त होऊन बसले आहे. कारण रगाडा नदीला कधी पूर येऊन रस्ता पाण्याखाली जाईल याची शाश्वती नाही. उसगाव, साखळी, फोंडा, मडगाव, पणजी आदी भागात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही यामुळे परवड होत आहे.

आश्वासनांना केराची टोपली

या ठिकाणी रस्ता एकदम नदीच्या तीरावर असल्याने लगेच पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या रस्त्याला उभारणी देण्याची मागणी गेली कित्येक वर्षे या भागातील नागरिक करत आहेत. मात्र, सरकारी पातळीवरून या कामाला नेहमी केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक भुयारसदृश भला मोठा खड्डा पडला होता. त्यावेळी रस्त्याच्या बाजूने पर्यायी रस्ता करून गाड्यांना वाट मोकळी करून दिली होती. त्यामुळे दुरुस्ती करताना या रस्त्याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: राज्यात क्रीडापटूंसाठी 4 टक्के पदे राखीव

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

Goa Politics: खरी कुजबुज; कामत अन् तवडकर

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

SCROLL FOR NEXT