Heavy rain in Tambdi Surla, Sacorda area in goa  Dainik Gomantak
गोवा

तांबडी-सुर्ल, साकोर्डा भागात जोरदार पाऊस

आसपासच्या काही भागांतही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या

दैनिक गोमन्तक

तांबडी-सुर्ल : तांबडी-सुर्ल, साकोर्डा भागात आज बुधवारी संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास अचानक आभाळ काळ्‍याकुट्ट मेघांनी भरून आले व धो-धो पाऊस पडला. गडगडाट, लखलखाट आणि सोसाट्याच्‍या वाऱ्यासह अवकाळी पावसाने या परिसराबरोबरच धारगे, तयडे, बोळकर्णे, मधलावाडा, सुर्ला, सातपाल आदी परिसराला झोडपून काढले. आसपासच्या काही भागांतही पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने लोक हैराण झाले होते. मात्र आज अवेळी पडलेल्या पावसामुळे जीवाची लाहीलाही होणाऱ्या या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. साधारणपणे पाऊण तास दमदार पाऊस पडला. दरम्‍यान, वादळी वाऱ्यांसह जोरदार पडलेल्या या पावसामुळे काजू, आंबा बागायतींत मात्र मोठे नुकसान झाले. त्यामुळे बागायतदारांनी चिंता व्‍यक्त केली आहे.

दरम्यान, केरळच्या (keral) किनाऱ्यापासून कोकण (kokan)किनाऱ्यापर्यंत त्याचप्रमाणे तटीय कर्नाटक प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या तीन ते चार दिवसात गोवा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेद्वारे (IMD Goa) वर्तवली होती. तर पणजी वेधशाळेचे वैज्ञानिक (Scientist) राहुल एम यांनी सांगितले, सत्तरी सांगे आदी सीमेलगतच्या तालुक्यात आज बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानात (temperature) वाढ व हवेतल्या ओल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. तसेच नागरिकांनी मोकळ्या आभाळाखाली, खुल्या जागेत, शेतात तसेच उंच झाडाखाली आसरा घेणे टाळावे असे आवाहन गोवा हवामान खात्याकडून (Goa Meteorological Department) करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT