चोरी करून आरोपी फरार, साळगाव पोलिसांनी केली अटक

आरोपी हॉटेलमध्ये सरव्यवस्थापक म्हणून करत काम होता
Accused absconding by theft, arrested by Salgao police
Accused absconding by theft, arrested by Salgao policeDainik Gomantak
Published on
Updated on

सांगोल्डा येथील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याने चोरी करून पळ काढला होता. हॉटेलमालकाने याची तक्रार पोलिसात केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास यंत्रणा हलवून आरोपीला अटक केली आहे. त्याला हॉटेलमधील 1 लाख रुपये रोख रक्कम चोरल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी अटक केली आहे.

चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव संतोष भोज असे आहे. त्याला बेळगावमधून अटक केली आहे. संशयित सदर हॉटेलमध्ये (Hotel) सरव्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याच हॉटेलमधील त्याने ही रक्कम चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पुढील कारवाई पोलिस (police) करत आहेत.

Accused absconding by theft, arrested by Salgao police
सत्तरीत गढुळ पाण्याचा पुरवठा; नागरिक हैराण

दरम्यान, चोरीच्या प्रकरणांची दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलिस प्रशासन (Administration) याबाबत जागरूकता ठेवत आरोपींना बेड्या ठोकत आहेत. त्यामुळे आरोपींमध्ये एक धास्ती निर्माण होताना दिसत आहे.

दरम्यान, सडा मुरगाव येथील एल्टन फर्नांडिस यांच्या घरातील 20 हजार रुपयांची सामग्री चोरी केल्याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी 19 वर्षीय विनायक राणे या संशयिताला अटक केली होती. घराच्या बाल्कनीचा दरवाजा फोडून संशयिताने घरातील विविध साहित्याची चोरी केल्याची तक्रार रविवारी दुपारी एल्टन यांनी पोलीस स्थानकावर नोंद केली. त्यानंतर मुरगाव पोलिसांनी कारवाई करून संशयिताला ताब्यात घेऊन त्यानंतर त्याला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com