Heavy Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

Heavy Rain in Goa: बाणावली येथे घरावर झाड कोसळून एक जखमी, सासष्टीत ठिकठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार; छपरासह साहित्याचे नुकसान

Goa rain latest news: वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे सासष्टीच्या विविध भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे सासष्टीच्या विविध भागात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. बाणावली येथील पॅट्रोसी चॅपेलनजीक घरावर झाड कोसळून सुमारे दीड लाखाची हानी झाली. तसेच एका बकरीचा मृत्यू झाला तर घरातील एकाला किरकोळ दुखापत झाली. नुवे, मायणा-कुडतरी व मडगाव भागातही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन पडलेली झाडे हटविली.

अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बाणावली येथील पॅट्रोसी चॅपेलनजीक दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोठे झाड जान्वारिओ रिबेलो यांच्या घरावर कोसळले. या घटनेत खाटेवर झोपलेल्या रिबेलो यांच्या डोक्याला मार लागला.

याशिवाय घराच्या छपरासह साहित्याचे नुकसान झाले. तसेच रिबेलो यांनी घराशेजारील शेडमध्ये पाळलेल्या बकऱ्यांपैकी एका बकरीचा मृत्यू झाला, एक जखमी झाली तर सुमारे १५ बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत अग्निशामक दलाने झाड बाजूला करत सुमारे दोन लाखांची मालमत्ता वाचवली.

दरम्यान, मायणा-कुडतरी येथील सेबी बारजवळील अंतर्गत रस्त्यावर चिंचेच्या झाडासह अन्य दोन झाडे कोसळली होती. सकाळी १० वा.पासून सव्वा एक वाजेपर्यंत झाड तोडून बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

अग्निशमन दलाकडून मदतकार्य

नुवे येथे एका घरावर माड कोसळला. तर पाजीफोंड येथील अ‍ानाफोंत गार्डनजवळ एका स्टॉलवर झाड कोसळेले. पाजीफोंड येथील सपना प्लाझा इमारतीजवळ मुख्य रस्त्यावर झाड कोसळले. अग्निशामक दलाने झाड कापून रस्ता खुला केला. राय येथे वीज उपकेंद्राजवळील संरक्षक भिंतीवर आंब्याचे झाड कोसळले होते. झाड हटवत अग्निशामक दलाने २० हजारांची मालमत्ता वाचवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT