

पणजी: अमेरिका–इस्रायल आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली गोवा–दुबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसने जाहीर केले आहे.
राज्यातील हजारो नागरिक पर्यटन तसेच व्यावसायिक कामांसाठी दुबईला ये–जा करीत असतात. अशा प्रवाशांना दाबोळी–दुबई विमानसेवेचा मोठा फायदा मिळत होता. परंतु, अमेरिका–इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा वणवा पेटल्याने त्याचा परिणाम अनेक गोष्टींसह विमानसेवेलाही बसला.
विविध विमान कंपन्यांनी गोवा तसेच भारतातून इतर काही देशांत होणारी विमानसेवा बंद केली होती. त्यानुसार दाबोळी–दुबई मार्गावरील सेवाही अनेक महिने बंद ठेवण्यात आली होती. परंतु, आता युद्धाला पूर्णविराम मिळाल्याने एअर इंडियाने ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.