Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: संततधार कायम; पडझडही सुरूच

अतिवृष्टीचा इशारा, अद्याप ५७.३ टक्के तूट

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. उद्या सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात अद्यापही ५७.३ टक्के तूट आहे. पावसामुळे राज्यभर पडझड सुरूच आहे. म्हापसा येथे संरक्षक भिंत कोसळून तीन गाड्यांचे नुकसान झाले, तर भटवाडी - कोरगाव येथे गोठ्यावर वडाचे झाड पडून दोन लाखांची हानी झाली.

अग्निशमन दलाला २८ कॉल्स : अग्निशमन दलाकडे गेल्या २४ तासांत विविध ठिकाणी घडलेल्या मोठ्या घटनांचे २८ कॉल्स आले. त्यातील १६ कॉल्स हे रस्त्यावर झाडे पडल्याचे, २ कॉल्स घरे कोसळण्याचे, तर ३ विजेच्या तारा तुटून पडण्याचे होते. कीस मोकळे केले.

मच्छीमारांना इशारा

सोमवारी मुसळधार पाऊस पडेल. गुरुवारपर्यंत पावसाची हीच स्थिती राहील. या काळात दक्षिण महाराष्ट्र आणि  गोवा किनारपट्टीवर ४० ते ४५ कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काणकोणमध्ये सर्वाधिक पाऊस

गेल्या २४ तासांत काणकोण येथे ११८ मि. मी., सांगे ८८.८ मि.मी., म्हापसा येथे ७२ मि.मी., तर राजधानी पणजीत ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी ‘ऑरेंज’, तर मंगळवारपासून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: "भारतीय चित्रपट निर्मात्यांना लाज वाटली पाहिजे" कांतारा चॅप्टर 1 पाहिल्यानंतर राम गोपाल वर्माची प्रतिक्रिया, पोस्ट चर्चेत

Illegal Beef Trafficking: मोले चेकपोस्टवर 800 किलो गोमांस जप्त! हुबळीहून मडगावकडे बेकायदेशीर मांस वाहतूक; गोवा पोलिसांची मध्यरात्री कारवाई

घर खरेदी करताय? सावधान! 'RERA'चा महत्त्वाचा निर्णय; कराराआधी अधिक रक्कम दिल्यास 'नुकसान भरपाई' नाही

Israel Attack: गाझावर इस्रायलचा क्रूर हल्ला; बॉम्बहल्ल्यात 70 जण ठार, मृतांमध्ये 7 निष्पाप चिमुकल्यांचाही समावेश Watch Video

West Bengal Landslide: दार्जिलिंगमध्ये पावसाचं रौद्ररूप! भूस्खलनाने हाहाकार; लोखंडी पूल कोसळला, अनेकांचा मृत्यू Watch Video

SCROLL FOR NEXT