Heavy rain affect on guirim panchayat mapusa  Dainik Gomantak
गोवा

गिरी पंचायतीला पाण्याचा वेढा; सर्वत्र पाणीच पाणी

जनजीवन विस्कळीत : बार्देशात रस्ते, शेतजमिनी-बागायतीला आले तलावाचे स्वरूप

दैनिक गोमन्तक

म्हापसा : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी दिवसभर सुरू राहिल्याने बार्देश तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, गिरी पंचायत कार्यालयाला पावसाच्या पाण्याने वेढा घातला होता. शिवाय तिथे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला.

हवामान खात्याने शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, त्यानुसार अपेक्षितपणे बार्देशात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यावेळी गिरी पंचायत कार्यालयाला पावसाच्या पाण्याने पूर्णतः वेढा घातला होता. त्यामुळे पंचायतीकडून जाणाऱ्या मार्गावर प्रशासनाने बॅरिकेड्स लावून हा रस्ता वाहतूकीला बंद केला होता. दरवर्षी हा परिसर मोठ्या पावसात जलमय होत असतो.

दरम्यान, म्हापसा शहरातील तसेच आजूबाजूच्या गावातील काही रस्त्यांवर पाण्याचे डबके बनले होते.

वाहतुकीवरही परिणाम

गिरी गावचा हा परिसर सखल तसेच शेतजमिनीचा भाग असल्याने येथील रस्ते हे पाण्याखाली गेले होते. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी, येथील शेतांना तळीचे रुप आले होते. रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवरही परिणाम जाणवला.

शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे

म्हापसा : म्हापसा शहर आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. शिवाय विविध रस्त्यांवर करण्यात आलेली डागडुजी तकलादू असल्याचे खड्ड्यांमुळे दिसून आले.

शहर परिससरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक ठिकाणी किरकोळ अपघातही घडल्याचे दिसून आले. दुचाकीस्वारांना वाहने चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले.

शहरातील खड्डे प्रशासनाने तातडीने बुजवावेत,अशी मागणी येथील टॅक्सी चालक आणि वाहनचालकांनी केली आहे. जेट पॅचरने डागडुजी करावी,अशी मागणीही केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT