डिचोलीतील वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

तेरा दिवसांचा प्रवास, उद्या भक्ती मेळाव्यात सहभागी
Bicholim Warkari
Bicholim WarkariDainikGomantak
Published on
Updated on

डिचोली : विठूमाऊलीच्या दर्शनाच्या ओढीने मुळगाव आणि डिचोलीतील अन्य भागातून निघालेल्या वारकऱ्यांनी अखेर सुखरूपपणे पंढरपूर गाठले आहे. रविवारी (ता. 10) आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी भरणाऱ्या भक्तांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी हे वारकरी अधीर झाले आहेत. पंढरपुरात पोचताच त्यांनी चंद्रभागेत स्नान केले.

Bicholim Warkari
गोव्यातील इंधनाच्या दरात अंशत: घट; जाणून घ्या आजचे दर

माऊली वारकरी मंडळ, मुळगाव वारकरी संस्था, श्री ज्ञानेश्वर माऊली संप्रदाय आणि अन्य काही वारकरी मंडळाच्या झेंड्याखाली मिळून जवळपास एक हजार वारकरी चालत पंढरपूरला गेले आहेत.

टाळ-मृदूंगाचा गजर आणि ''ज्ञानबा तुकाराम, माऊली तुकाराम, आदी श्री विठ्ठलनामाचा जयघोष करीत या वारकऱ्यांनी पंढरपूरची वाट धरली होती. दुपारी आणि रात्री नियोजित ठिकाणी विश्रांती घेत तेरा दिवस चालत या वारकऱ्यांनी पंढरपूर गाठले आहे.

उत्साही स्वागत

विठूमाऊलीच्या कृपेने शुक्रवारी वारकरी सुखरूपपणे पंढरपूरला पोचले आहेत. सर्वत्र वारकऱ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले, अशी माहिती वारकरी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथभाऊ गाड यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता दिली. पंढरपूरला पोचताच चंद्रभागेत स्नान केले, असे पुतूलो गाड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com