MLA Michael Lobo & Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रतेबाबत याचिकेवर आता 'या' दिवशी सुनावणी; लोबो, कामत यांना नोटीस

अमित पाटकर यांनी दाखल केली होती याचिका

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Assembly MLA Disqualification Petition: गोव्यातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधील आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात त्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणाऱ्या याचिका दाखल झाल्या होत्या.

त्यापैकी एक याचिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही दाखल केली होती. त्या याचिकेवर आता २६ जून रोजी सुनावणी होणार आहे.

26 जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होईल. त्यासाठी उपस्थित राहण्यासाबाबतची नोटीस आमदार मायकल लोबो, आमदार दिगंबर कामत तसेच अमित पाटकर यांना विधानसभा सचिवालयाने पाठवली आहे.

पाटकर यांनी दाखल केलेली याचिका विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी मान्य केली होती. तेव्हा कामत आणि लोबो (Michael Lobo and Digambar Kamat) यांनी ही याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.

पाटकर (Amit Patkar) हे सभागृहाचे सदस्य किंवा आमदार नसल्यामुळे ते अपात्रता याचिका दाखल करू शकत नाहीत. असा दावा लोबो, कामत यांनी केला होता.

दरम्यान, पाटकर यांनी सभापती विरुद्ध उत्कल केशरी परिदा या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत, कोणतीही इच्छुक व्यक्ती अपात्रता याचिका दाखल करू शकते असा युक्तिवाद केला.

त्यावर राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार कोणालाही अपात्रता याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, असे सभापतींनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT