Goa Real Estate Market: सेकंड होम खरेदीसाठी ग्राहकांचे गोव्याला प्राधान्य; रिसर्चमधून समोर आली बाब

लक्झरी घरांच्या मागणीत वाढ
Goa Real Estate Market
Goa Real Estate MarketGoogle image
Published on
Updated on

Goa Real Estate Market: घर खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असतेच. पण देशातील एक वर्ग असाही आहे, जो नेहमीच त्यांच्या सेकंड होमचा विचार करत असतो. म्हणजेच त्यांचे एक घर असतेच, पण गुंतवणूक म्हणून किंवा राहण्यासाठी आणखी असावे म्हणून म्हणा, हे लोक सेकंड होम खरेदी करतात.

तर अशाच सेकंड होम खरेदीदारासांठी गोवा हे टॉपमध्ये असलेले राज्य बनले आहे. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विशेषतः लक्झरी सेगमेंटमध्ये गोव्यातील घरांची मागणी वाढत आहे. म्हणजेच ज्या घरांची किंमत 1 कोटी ते 3 कोटी रूपयांदरम्यान आहे, असा सेगमेंट. प्रॉपर्टी रिसर्च फर्मच्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

Goa Real Estate Market
Margao News: मडगावात थेट सराफ दुकानात घुसली भरधाव कार; तीन दुचाकींनाही उडविले...

या रिसर्चमधील माहितीनुसार मुंबई आणि बेंगळुरूमधील गुंतवणूकदारांकडून प्रीमियम घरांची मागणी होत आहे. तर दिल्लीतील गुंतवणूकदार किरकोळ आणि व्यावसायिक रिअल इस्टेटसाठी उत्सुक आहेत. रिअल इस्टेट मार्केटमध्‍ये गोवा हे दुसऱ्या घरांसाठीची अव्वल पसंती ठरत आहे.

पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, हायब्रीड वर्क कल्चर, समुद्र किनारे, पर्यटन यामुळे गोव्याला अधिक पसंती मिळत आहे.

गोव्यातील आसगाव, हणजुणे, पर्वरी, शिवोली येथे लक्झरी व्हिला आणि घरांसाठी ऑनलाईन सर्चिंग अधिक होत आहे. गोव्यातील आसगावमधील जमिनी आणि घरांच्या किंमती दिल्ली एनसीआरमधील गुरूग्रामच्या बरोबरीच्या आहेत, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

Goa Real Estate Market
Goa Crime: वाळपईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; बनवली अश्लील चित्रफित

गुंतवणूकदारांमुळे गोव्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये येत्या काही वर्षांत वाढ होणार आहे, असेही या अभ्यासात म्हटले आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालाही आता मोठा भाव येऊ लागला आहे.

दरम्यान, हाऊसिंग डॉट कॉम ही रियॅल्टी फर्म गोव्यात त्यांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com