फोंडा: गोव्याच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा हिस्सा म्हणजे 'हात-कतरो खांबो'. याबद्दलच एक व्हिडीओ शेफाली वैद्य यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. 'हात-कतरो खांबो' हा पोर्तुगीजांनी केलेल्या धर्मछळाचा एक भयावह पुरावा आहे.
गोव्यातील जनतेवर झालेल्या अत्याचारांची साक्ष देणारा हा हृदयद्रावक अवशेष सध्या उपेक्षित अवस्थेत आहे. आज या स्तंभाचा चौथरा मोकाटपणे दारू आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांच्या ताब्यात आहे.
"गोव्याच्या इतिहासातील एका भीषण काळाचा साक्षीदार असलेला 'हात-कतरो खांबो' सध्या अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून, त्याची होत असलेली विटंबना पाहून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'गोवन इन्क्विझिशन'च्या क्रूर अत्याचाराची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक अवशेष दारुड्या आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांसाठी अड्डा बनल्याचे पाहून धक्का बसलाय. ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे." असं म्हणत संबंधितांकडून याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी गोव्यातील इतिहासाच्या अभ्यासिका शेफाली वैद्य यांनी केली आहे.
"भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि गोवा सरकारचा पुरातत्व विभाग इतर ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करतो. मात्र, याच जुन्या गोव्यात असलेल्या 'हात-कतरो खांबो'सारख्या ऐतिहासिक स्तंभाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. पुरा" असं शेफाली वैद्य म्हणाल्या आहेत.
इतिहासकारांच्या मते, हा खांबो केवळ एक दगडी अवशेष नाही, तर तो एका भीषण काळाची आणि त्या काळात गोव्यातील समाजाला सोसाव्या लागलेल्या यातनांची मूक साक्ष देतो.
अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळाचे संरक्षण करणे हे केवळ सांस्कृतिक वारशाचे जतन नाही, तर ते समाजाच्या सामूहिक स्मृतीचे आणि सन्मानाचे प्रतीक आहे.
'हात-कतरो खांबो' केवळ इतिहासाचा एक भाग नाही, तर तो गोव्यातील जनतेच्या सहनशीलतेचा जिवंत पुरावा असूनही आज त्याचीच विटंबना चालू आहे. सरकारने तातडीने याकडे लक्ष देऊन 'हात-कतरो खांबो' आणि अशा इतर दुर्लक्षित ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.