Hatkatro Khamb In Goa: ‘हात कात्रो खांबा’ची विटंबना; राज्याच्या पुरातत्त्व खात्याने लक्ष घालण्याची होतेय मागणी

जुने गोवेत वारसा कार्यकर्त्यांकडून निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
Hatkatro Khamb
Hatkatro KhambDainik Gomantak
Published on
Updated on

Hatkatro Khamb In Goa जुने गोवा येथील वारसा स्मारक असलेल्या ‘हात कात्रो खांबा’ची विटंबना केल्याचा प्रकार घडला आहे. खांबावर पिवळा रंगाची पट्टी रंगवल्याने स्मारकाशी छेडछाड केली आहे. हा खांब ऐतिहासिक असून याची देखरेख घेण्याची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण किंवा गोवा पुराभिलेख आणि पुरातत्त्व खात्याने केली पाहिजे, अशी मागणी वारसा कार्यकर्ते करत आहे.

‘हात कात्रो खांब’ हा पूर्वी जुने गोवा येथे महात्मा गांधीजींच्या पुतळा असलेल्या जागी डावीकडे होता. परंतु सुमारे 1977 साली जेव्हा गांधीजींचा पुतळा बसवण्यात आला, तेव्हा हा स्थलांतरित करण्यात आला होता.

त्यावेळी ज्या जागी हा आणला होता, तेथे राष्ट्रीय महामार्ग होणार याची कल्पना करण्यात आली नव्हती. त्यामुळे खांब स्थलांतर करण्याचे सत्र सुरू होऊन त्याची विटंबना होण्यापर्यंत हा प्रकार पोहोचला आहे.

‘हात कात्रो खांब’ हा जुने गोवा येथील वारसा स्मारक असून त्याची देखरेख होणे अपेक्षित आहे. खांबाला रंगवल्याचे छायाचित्र मला अनेकांनी पाठवल्यानंतर मला धक्का बसला. ही वारसा आणि इतिहासाबरोबर छेडछाड केल्याचा प्रकार आहे.

भविष्यात हा प्रकार घडू नये, यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि गोवा सरकारच्या पुराभिलेख आणि पुरातत्त्व खात्याने कुंपण घालणे गरजेचे आहे, तसेच खांब पूर्ववत केला पाहिजे.

-प्रा. प्रजल साखरदांडे, पणजी.

Hatkatro Khamb
Film City in Goa: लोलये येथे साकारणार बहुचर्चित चित्रनगरी...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com