Harmful chemicals have polluted the Velsao beach of Goa for some time 
गोवा

Velsao Beach: घातक रसायनांमुळे वेळसाव समुद्रकिनारपट्टी प्रदूषित

Harmful Chemicals: वेळसाव समुद्रकिनारी सोडल्या जाणाऱ्या प्रदूषणकारी रसायनांचा मुद्दा ''गोंयच्या रापणकरांचो एकवोट''ने २०१८ मध्येच उपस्थित केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Velsao Beach: वेळसाव समुद्रकिनारी सोडल्या जाणाऱ्या प्रदूषणकारी रसायनांचा मुद्दा ''गोंयच्या रापणकरांचो एकवोट''ने २०१८ मध्येच उपस्थित केला होता, असे स्पष्टीकरण गोंयच्या रापणकरांचो एकवोटने दिले आहे. राज्यातील काही जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून येत असताना, गोंयच्या रापणकरांचो एकवोट आताच हा मुद्दा का उपस्थित करत आहे, अशी टीका झाल्यानंतर गोंयच्या रापणकरांचो एकवोटने वरील निवेदन दिले आहे.

वेळसाव समुद्रकिनारी मृत माशांचा खच पडलेला आढळत असल्याने गोंयचो रापोणकारांचो एकवोटने तेथे येऊन हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र काही मच्छीमार बांधवांनी याला आक्षेप घेऊन त्यांना मच्छीमारांची समस्या आताच दिसली का, अशी टीका केली होती. या टीकेला गोंयच्या रापणकरांचो एकवोटने उत्तर दिले आहे.

२०१८ मध्ये गोंयच्या रापणकरांचो एकवोटचे सरचिटणीस ओलेन्सिओ सिमॉईस यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून झुआरी अॅग्रो केमिकल्स लिमिटेडतर्फे झुआरीनगर येथून पाण्याचा निचरा वेळसाव येथे केला जात असल्याचे सांगितले होते.

झुआरी अॅग्रोतर्फे आपले सांडपाणी आणि रसायने सतत समुद्रात सोडत आहे. यामुळे समुद्राला जोडणारा संपूर्ण जलप्रवाह पांढऱ्या रंगाचा होऊन आजूबाजूच्या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच माशांचा मृत्यू होत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मासेमारी व्यवसायालाही यामुळे अडथळा निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT