Harmal Dainik Gomantak
गोवा

Harmal News : फांदी पडून गोठ्याची मोडतोड, गुरे बचावली

Harmal News : हरमल येथील घटना : तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News :

हरमल, वरचावाडा येथील कृष्णा पार्सेकर यांच्या गुरांच्या गोठ्यावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने गोठ्यातील गुरांना इजा झाली नाही.

गोठ्याची मोडतोड झाल्याने गुरांना उघड्यावर बांधणे पार्सेकर यांना भाग पडले आहे. सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत हे.

दरम्यान, फांदी तुटून पडलेले आंब्याचे झाड धोकादायक असून ते हटवावे अशी मागणी पार्सेकर कुटुंबीयांनी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली आहे.

पार्सेकर यांच्या घरासमोर गोठा असून जवळच आंब्याचे झाड आहे. हे झाड हटविण्याचा आदेश वन खात्याने दिला होता, परंतु त्या आदेशास स्थगिती मिळवली आहे.

सरपंचांकडून पाहणी :

दरम्यान, स्थानिक पंच तथा सरपंच रजनी इब्रामपुरकर फांदी पडून मोडतोड झालेल्या गोठ्याची पाहणी केली. तलाठ्यांमार्फत नुकसानीचा पंचनामा केला जाईल. संबंधित खात्याने पार्सेकर यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी,यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

वन खात्याबाबत नाराजी

स्वयंरोजगार करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सरकार वारंवार करते, परंतु गायी, म्हशी घेऊन स्वयंरोजगार केला, तर त्याला हे सरकार संरक्षण देत नाही. गोठा धोक्यात तरी वन खात्याने स्थगिती दिली, याचे आश्चर्य वाटते, असे पार्सेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT