Goa Congress: एकाचे कारगिल युद्धात योगदान दुसरे माजी केंद्रीय मंत्री! गोव्यातील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कोण आहेत?

Goa Congress Loksabha Candidate: खूप दिवसांच्या विलंबानंतर अखेर काँग्रेसने गोव्यातील दोन्ही लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.
Goa Congress Loksabha Candidate| Ramakant Khalap And capt. Viriato Fernandes
Goa Congress Loksabha Candidate| Ramakant Khalap And capt. Viriato FernandesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Loksabha Candidate

खूप दिवसांच्या विलंबानंतर अखेर काँग्रेसने गोव्यातील दोन्ही लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. अनेक इच्छुकांच्या भाऊर्दीत कोणाला उमेदवारी द्यावी असा पेचप्रसंग गोव्यात निर्माण झाला होता. एवढेच नव्हे तर त्यावरुन प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

अखेर काँग्रेसने उत्तर गोव्यात माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि दक्षिणेत कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

काँग्रेसकडून लोकसभा लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. प्रदेश काँग्रेसकडून दिल्लीत विविध नावाची शिफारस करण्यात आली. काँग्रेसच्या छाननी समितीकडून संभाव्य उमेदवारांच्या निवडून येण्याच्या क्षमतेसह विरोधी उमेदवार अशा विविध घटकांवर चर्चा झाली.

उमेदवार निश्चितिला विलंब होत गेला तसा राज्यातील पक्ष संघटनेत धुसफूस वाढत गेली. एकवेळ प्रदेश संघटनेत दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. राज्यातून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गिरीश चोडणकर, सुनिल कंवठणकर यांची नावे शर्यतीत होती.

राज्यात भाजपने दोन्ही उमेदवारांची घोषणा करुन प्रचाराचा देखील शुभारंभ केल्याने काँग्रेसवर उमेदवार घोषणेसाठी दबाब वाढत होता. अखेर शुक्रवारी रात्री दिल्लीत अंतिम बैठक झाल्यानंतर रमाकांत खलप आणि कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

Goa Congress Loksabha Candidate| Ramakant Khalap And capt. Viriato Fernandes
Goa Congress Loksabha Candidate Declared: अखेर मुहूर्त मिळाला! गोवा लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा

रमाकांत खलप कोण आहेत?

पाचवेळा आमदार राहिलेले रमाकांत खलप यांचा जन्म 05 ऑगस्ट 1946 रोजी मांद्रे येथे झाला. खलप यांनी बीएस्सीतून पदवी घेतली असून, त्यांनी कायद्याचे देखील शिक्षण घेतले आहे. त्यांना मराठी, इंग्रजी, कोकणी, हिंदी, फ्रेंचसह पोर्तुगीज भाषेचे देखील ज्ञान आहे.

खलप गोवा विधानसभेत सहावेळा आमदार म्हणून प्रतिनिध्तव केले. याकाळात त्यांनी विरोधी पक्षनेत्यासह उपमुख्यमंत्री पदाची धुरा संभाळली आहे.

खलप 1996 मध्ये मगोच्या तिकिटावर संसदेत निवडून गेले, याकाळात त्यांच्याकडे केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. 2007 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून दूर होते.

Goa Congress Loksabha Candidate| Ramakant Khalap And capt. Viriato Fernandes
Panjim: अंधारात होते पाप! 'स्मार्ट पणजी'साठी 200 वर्ष जुन्या झाडाची रात्रीच्या वेळेस कत्तल

कॅप्टन विरीयातो फर्नांडिस कोण आहेत?

काँग्रेसने दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांच्या उमेदवारी जाहीर केली आहे. विरीयातो फर्नांडिस निवृत्त नौदल अधिकारी आहेत. विरीयातो यांनी 1999 च्या कारगिल युद्धात योगदान दिले आहे. यासाठी त्यांचा विजय स्टार पदक देऊन गौरव देखील करण्यात आला आहे.

विरीयातो फर्नांडिस यांनी 2022 साली काँग्रेसच्या तिकीटावर दाबोळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्यांना विद्यमान पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, त्यांना सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात सक्रिय सहभाग असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com