Sagar Ekoskar Dainik Gomantak
गोवा

हनुमंत परब मारहाण प्रकरणी एकोस्कर यांची होणार खात्याअंतर्गत चौकशी

अधीक्षक सॅमी तावारीस चौकशी अधिकारी: परब यांची हजेरी

दैनिक गोमन्तक

मडगाव: वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्याकडून पिसुर्ले शेतकरी नेते हनुमंत परब यांना झालेल्या कथित मारहाणीची पोलीस खात्याअंतर्गत चौकशी सुरु झाली असून चौकशी अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Hanumant Parab beating case Dysp Sagar Ekoskar Inquiries under the Department )

सध्या दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पदाचा ताबा सांभाळणारे तावारीस यांच्या समोर आज मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस उपमुख्यालयात पहिली सुनावणी झाली. यावेळी तक्रारदार हनुमंत परब यांनी स्वतः उपस्थित राहून पुढील तारीख मागून घेतली. आता 9 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

पिसुर्ले खनिज वाहतूक विरोधात अन्य पोलिसांविरोधात ही तक्रार

खाणीमुळे पिसुर्ले येथील शेतीची हाणी होते. यापूर्वी झालेली नुकसान भरपाईही दिली नसल्याने हनुमंत परब यांच्या नेतृत्वाखाली 10 मार्च 2022 रोजी पिसुर्ले येथील शेतकऱ्यांनी खनिज वाहतूक अडवून धरली होती. यावेळी पोलिसांनी त्यांना प्रतिबंधनात्मक अटक करून कोठडीत ठेवले असता तिथे सागर एकोस्कर आले व अन्य पोलिसांच्या मदतीने आपल्याला जबर मारहाण केली असा आरोप त्यांनी केला होता.

एकोस्कर यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाचे दरवाजेही ठोठावले होते.यासंदर्भात परब यांच्याशी संपर्क साधला असता, आपण तावारीस यांच्या समोर हजर झालो. मात्र आजच मुंबई उच्च न्यायालयात आपले याच संदर्भात आणखी एक प्रकरण असल्याने आपण पुढची तारीख मागून घेतली असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गोवा पोलिसांकडून 1371 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

VIDEO: भारत-पाक सामन्यात 'चिटींग'? खेळाडूनं घेतला जबरदस्त झेल, तरीही पंचानी दिलं नॉट आउट! 'ICC'चा नियम काय सांगतो?

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT