शेळडे पंचायत सचिवांना कारणे दाखवा नोटीस

माहिती न दिल्याबद्दल राज्य माहिती आयुक्तांकडून कारवाईचा इशारा
RTI
RTIDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: माहिती हक्क कायद्या अंतर्गत मागवलेली आरटीआय दाखल केला असता जाणिवपूर्वक माहिती न दिल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांनी केपे तालुक्यातील शेळडे पंचायतीचे सचिव रविंद्र वाडीकर याच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

( Right to Information Act under Action against Shelde Panchayat Secretary of Quepem taluka )

RTI
नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी गणेश विसर्जन स्थळाची केली पाहणी

राज्य माहिती आयुक्तांनी पंचायत सचिवास तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण देण्यात यावे असे म्हटले आहे. या प्रकरणी आता 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोनफातर - शेळडे येथील अनिल सावंत देसाई यांनी वाडीकर यांच्याविरोधात माहिती आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती. सोनफातर येथील हौसिंग बोर्डाच्या खुल्या जागेत स्थानिक पंचायतीकडून हॉलीबॉल मैदान बांधले जात होते. या मैदानाला हौसिंग बोर्ड रहिवाशांनी विरोध केला होता.

RTI
Vasco Market: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर माटोळी साहित्याने सजले

या प्रकरणी सावंत देसाई यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात पंचायतीकडून माहीती हक्क कायद्याखाली माहिती मागितली होती. मात्र वाडीकर यांनी ती त्यांना दिल्याने त्या विरोधात प्रथम भाग विकास अधिकारी व नंतर राज्य आयुक्तांकडे आव्हान याचिका दाखल केली होती.

ही माहिती न देता पंचायत सचिवांनी माहिती हक्क कायद्याच्या कलम 20 (1) व 20 (2) चा भंग केल्याबद्दल कारवाई का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण देण्यात यावे असे ढवळीकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामूळे शेळडे पंचायत सचिवाविरोधात कारवाई होणार का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com