Central Jail Of Goa Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील निम्मे कैदी तुरुंगाबाहेर

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या तुरुंगातील जवळपास निम्मे कैदी राज्यातील कोविड-19 साथीच्या प्रतिबंधामुळे पॅरोलवर बाहेर आहेत, तर अनेक जण पुढील पॅरोल बाकी असुन देखील स्वेच्छेने पुन्हा तुरुंगामध्ये परतले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. (half of the convicts from Goa prison are out on parole due to COVID-19 pandemic)

कळवले येथील मध्यवर्ती कारागृहाशी (Central Jail) संबंधित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की संपूर्ण गोव्यातील एकमेव तुरुंग आहे, की जे कोविड-19 राज्यात कहर केल्यानंतर 110 पैकी 61 दोषींना 13 मे 2021 रोजी पॅरोलवर सोडले होते. तुरुंगात (Jail) कोविड-19 चा प्रसार टाळण्यासाठी दोषींना पॅरोलवर त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. “110 पैकी एकूण 61 दोषींना तुरुंगातील त्यांच्या वागणुकीनुसार पॅरोल देण्यात आला. त्यांच्यापैकी 18 जणांना पुढील पॅरोल बाकी असुन देखील ते पुन्हा कोठडीत परतले,” असे ते म्हणाले,

बाकीचे लोक त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. ते पुढे म्हणाले की, कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात असल्याने पॅरोलबाबतीत निर्णय घेण्यासाठी तुरुंग महानिरीक्षकांसोबत उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक होणार आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली ते पुढे म्हणाले “पॅरोल जास्तीत जास्त एक महिन्यासाठी वाढवले ​​जाऊ शकते दरम्यान दोषींना (Prisoner) तुरुंगात परत जावे लागेल.” कारागृह व्यवस्थापनाने कोविड-19 (Covid 19) निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून कैद्यांच्या नातेवाईकांना आठवड्यातून दोनदा भेट देण्याची मुभा बंद केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उच्चाधिकार समिती ही मुभा पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे कारण अनेक नातेवाईक त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तुरुंगात रांगेत उभे असतात अशी माहिती त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT