Halarn Panchayat Sarpanch  Dainik Gomantak
गोवा

Halarn Panchayat: हळर्ण सरपंचपदासाठी एकच अर्ज! सिद्धी राऊळ बिनविरोध

Halarn Sarpanch: एकच उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक निरीक्षक ठाकूर यांनी सिद्धी राऊळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले

गोमन्तक डिजिटल टीम

Halarn Sarpanch:

हळर्ण पंचायतीच्या सरपंचपदी सिद्धी राऊळ यांची बिनविरोध मंगळवारी निवड झाली. सरपंच महेश्वर परब यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सिद्धी राऊळ यांचे नाव दिव्या नाईक यांनी सुचवले तर महेश परब यांनी त्याला अनुमोदन दिले.

सरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक निरीक्षक भिवा ठाकूर यांनी सिद्धी राऊळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी उपसरपंच आरती राऊळ, पंच सदस्य विनोद हरिजन, रामचंद्र परब ,दिव्या नाईक, शैलेश नाईक, महेश्वर परब उपस्थित होते. पंचायत सचिव अमोल सावंत यांनी निवडणुकीसाठी सहकार्य केले.

पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सिद्धी राऊळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सरपंच सिद्धी राऊळ म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्यामुळे आपली बिनविरोध निवड झाली आहे.

आपण पंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास सर्वांना सोबत घेऊन करणार आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला आपण पात्र ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

SCROLL FOR NEXT