ग्रामसभेला दांडी!

 

Dainik Gomantak

गोवा

...त्यामुळे आजही गुळेलीच्या ग्रामसभेला दांडी!

गुळेली पंचायतीने ग्रामसभा आयोजित केली होती, पण सभेला सदस्य उपस्थित न राहिल्याने सभा वारंवार रद्द होत आहे.

दैनिक गोमन्तक

गुळेली (प्रेमानंद नाईक): सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदार संघात येणाऱ्या गुळेली ग्रामपंचायत सध्या वेगळ्याच विषयावरुन गाजत आहे. काल मुक्तिदिनादिवशी गुळेली पंचायतीने ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु या ग्रामसभेला एकमेव पंचसदस्य अर्जुन मेळेकर वगळता इतर सर्व पंच मंडळी सरपंच, उपसरपंच व पंचायतीचे सचिव इतर ठिकाणी ताबा असल्याचे कारण पुढे करून गैरहजर राहिल्याने काल बदली सचिवांना ग्रामसभेला उपस्थित लोकांना तोंड द्यावे लागले.

काल इतर पंचसदस्य अनुपस्थित राहिले म्हणून लोकांच्या आग्रहाखातर आज ग्रामसभा घेण्याचे ठरविले होते. परंतु आजही कालप्रमाणे मैंगीणे पंचसद्स्य अर्जुन मेळेकर वगळता बाकी इतर पंच गैरहजर राहिले. त्यामुळे आजही ग्रामसभा झाली नाही. त्यामुळे संतृप्त ग्रामस्थांनी आजपासून या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत पंचायतीची ग्रामसभा होत नाही आणि बीडीओ किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून आमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही तो पर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांनी सांगितले आहे.

12 रोजी झालेल्या ग्रामसभेत आयआयटी विषयावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी पंचायत मंडळ त्याची उत्तरे देण्यात असमर्थ ठरले होते. आणि पुढील ग्रामसभा आयोजित करून या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असे, आश्वासन दिले होते. परंतु कालच्या ग्रामसभेस सर्वांनी दांडी मारल्याने ग्रामस्थ विशेषतः मेळावली भागातील ग्रामस्थ संतापले आहेत.

आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात नागरिक पंचायत कार्यालयाकडे जमले होते. यात महिलांचाही समभाग होतो. यावेळी बोलताना शशिकांत सावर्डेकर म्हणाले की, आम्ही जे आमचे प्रश्न पंचायतीला सादर केले आहेत, त्यांची जो पर्यंत आम्हाला उत्तरे मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालूच ठेवणार आहे. आयआयटीचे आंदोलन आम्ही नऊ महिने चालवले, आता परत हे आंदोलन सुरू करत आहोत.

शंकर नाईक म्हणाले की सरकार, सरकार तुमच्या दारी कार्यक्रम राबवत हिंमत असेल तर सरकारने वाळपईत आणि मेळावलीत हा कार्यक्रम राबवावा आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शुभम शिवोलकर म्हणाले की, काल झेंडावंदन होते तिथे सुद्धा काही पंचांनी उपस्थिती लावली नाही यावरुन कळून चुकते की या निवडून दिलेल्या माणसांना देशाबद्दल किती प्रेम आहे हे लक्षात येते. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी प्रितेश नाईक यांनी ही विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT