Liquor Smuggling: Dainik Gomantak
गोवा

Liquor Smuggling: मद्य तस्करी रॅकेटप्रकरणी गुजरात पोलिस गोव्यात दाखल

Goa Liquor Smuggling Racket: आंतरराज्य रॅकेट: लिगोरिनोच्या शोधात काणकोण, होंडा येथे छापे

दैनिक गोमन्तक

Goa Liquor Smuggling Racket: गुजरात - गोवा आंतरराज्य मद्य तस्करी रॅकेटप्रकरणाच्या तपासकामासाठी गुजरात पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झाले आहे.

या पथकाने सत्तरी तालुक्यातील काणकोण व होंडा येथील काही ठिकाणी छापे टाकून या रॅकेटमधील लिगोरिनो डिसोझा याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. आणखी काही दिवस हे पथक या तस्करीप्रकरणाच्या माहितीसाठी गोव्यात वास्तव्य करणार आहे.

गुजरात पोलिस पथक मद्य तस्करीच्या आंतरराज्य रॅकेटच्या तपासकामासाठी गोव्यात आले आहेत व ते या रॅकेटमधील सूत्राधार लिगोरिनो डिसोझा याचा शोध घेत असल्याच्या वृत्ताला काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकात गावस यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी काणकोण पोलिसांची मदत घेतली आहे.

या तस्करीप्रकरणी गुजरातमध्ये तक्रार दाखल झाली असून त्याच्या तपासासाठी ते गोव्यात आले आहेत. आज दिवसभर या गुजरात पोलिस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, काहीच धागेदोरे सापडले नाहीत.

अबकारी अधिकारीही गुंतल्याचा संशय

काणकोण येथील भागातून गुजरातमध्ये मद्य तस्करी करणारे रॅकेट वावरत असल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली आहे.

या रॅकेटमध्ये राज्यातील काही अबकारी अधिकारी गुंतले असल्याचा या गुजरात पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत यासंदर्भात हे पथक अबकारी अधिकाऱ्यांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे.

काही महिन्यापूर्वी अबकारी खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे हे खाते प्रकाशझोतात आले होते. राज्यातून गोव्याबाहेर मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत आहे.

तपासणी नाक्यांवर अबकारी अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा होत आहे. गोव्याच्या हद्दीतून मद्य तस्करी करणारे ट्रक सुटतात, मात्र महाराष्ट्र वा कर्नाटक पोलिसांनी कारवाई होत आहे. त्यामुळे गोव्यातील या अधिकाऱ्यांच्या तपासणीबाबत शंका उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT