Minister Govind Gawde: आपली दृष्टी सदैव सकारात्मक ठेवावी

साखळीतील ‘व्हिजन फॉर ऑल’ कार्यक्रमात नेत्रविषयक मार्गदर्शन
 Art and Culture Minister Govind Gawde
Art and Culture Minister Govind GawdeDainik Gomantak

Art and Culture Minister Govind Gawde: नेत्र ही मानवी जीवनाला मिळालेली एक अनमोल दैवी देणगी आहे. तेव्हा डोळ्यांची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ओठावरील भावना डोळ्यांतून व्यक्त करण्याची किमया या नेत्रांमध्ये आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर दृष्टिहीन व्यक्तीसुध्दा जगाच्या पाठीवर चांगली कामगिरी बजावत आहे. आपली दृष्टी सदैव सकारात्मक ठेवावी, असे आवाहन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी साखळी रवींद्र भवनात केले.

 Art and Culture Minister Govind Gawde
Electricity In Benaulim: बाणावलीतील वीजपुरवठा डिसेंबरपर्यंत होणार सुरळीत

गोवा सिएसआर प्राधिकरण, नियोजन, मूल्यमापन व सांख्यिकी संचालनालयाने प्रसाद नेत्रालय सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटल उडुपी कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन फॉर ऑल कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, ऑनसाईट फाउंडेशनचे धर्मानंद राय, संचालक महेश के. व्ही., प्रसाद नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कृष्ण प्रसाद कुडुलू, नियोजन, मूल्यमापन व सांख्यिकी संचालनालयाने संचालक डॉ. कैलास गोखले आदींची उपस्थिती होती.

डोळे ही आपली मोठी संपत्ती असून तिची निगा राखण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असायला हवे. पालकांनी आपल्या मुलांच्या नजरेकडे तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले. आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. कृष्ण प्रसाद कुडुलू यांनीही मार्गदर्शन केले. आभार संचालक डॉ. कैलास गोखले यांनी मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com