Accident News: बांबोळी उतरणीवरील वळण मृत्यूचा सापळा !

Bambolim Accident News: सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष : चालकांचे वाहनावरील सुटतेय नियंत्रण
Bambolim Accident News
Bambolim Accident NewsDainik Gomantak

Bambolim Accident News: बांबोळी येथून पणजीच्या दिशेने येताना महामार्गावरील सांताक्रुझ उतरणीवरील वळण हे धोकादायक बनले आहे.

या उतरणीवर काही दिवसांपूर्वी मालवाहू अवजड वाहन चालकाचे नियंत्रण जाऊन संरक्षण कठडा मोडून उलटण्याच्या घटना घडल्या.

Bambolim Accident News
Minister Govind Gawde: आपली दृष्टी सदैव सकारात्मक ठेवावी

वारंवार असे प्रकार घडत असूनही या वळणाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सरकारी यंत्रणेने अजून कोणतीच पावले उचललेली नाहीत.

काही हलकी वाहनेही संरक्षक कठड्याला धडक ण्याचे प्रकार घडले. त्यामुळे हे वळण धोकादायक बनले आहे.

मडगावहून पणजीला येणारी अवजड वाहने झुआरी पुलावरून वळवण्यात येत असल्याने ही वाहने ही बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्गावरून येतात.

उड्डाण पुलानंतर पणजीकडे येताना सांताक्रुझ येथे उतरण लागते. तिथे फलक नसल्याने चालकाची तारांबळ उडते. येथे दोन महिन्यात दोन कंटेनर उलटले.

Bambolim Accident News
Film festival: विद्यापीठात फिल्म महोत्सव

1940 अपघात; 197 जणांचा मृत्यू

यावर्षी १,९४० अपघात झाले. यांतील अपघात १८० भीषण होते. त्यांत १९७ जणांनी जीव गमावले. सरासरी दर ३० तासांत एकाचा अपघाती मृत्यू, दिवसाला ८ अपघात होतात. २०२३ मध्ये २०२२ च्या तुलनेत ६५ (३.२४ टक्के) अपघात कमी झाले. अपघाती मृत्यूंत ३७ (२३.१२ टक्के) मृत्यू जास्त झाले. राज्यात यावर्षी १६७ गंभीर अपघातांत २५६ जणांना गंभीर दुखापत झाली. ३४२ अपघातांत ५४६ जणांना किरकोळ दुखापत झाली. १,२५१ अपघातांत वाहनांचे नुकसान झाले. गेल्या वर्षी याच काळात राज्यात २,००५ अपघात झाले. त्यांतील १४८ अपघातांत १६० जणांचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com