Trekking expedition to Tambdi Surla waterfalls Dainik Gomantak
गोवा

तांबडी सुर्ल धबधबा ट्रेकिंग मोहिमेची पहिली बॅच रवाना; गोवा पर्यटन विकास महामंडळाचे आयोजन

अशा उपक्रमांमुळे छोट्या छोट्या व्यवसायांना चालना मिळणार

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे (Goa Tourism) तांबडी सुर्ल येथील धबधबा परिसरात ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंग मोहिमेची पहिली बॅच आज रवाना झाली. पर्यटन विकास महामंडळचे चेअरमन डॉ. गणेश गांवकर यांनी झेंडा फडकवुन सुरुवात करण्यात आली.

या मोहिमेत तांबडी सुर्ल (tambdi surla) येथील शिव मंदीरालाही भेट देण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.

आमदार डॉ. गांवकर म्हणाले की, मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्गाचे आशीर्वाद आम्हाला लाभले आहेत. अशा उपक्रमांमुळे केवळ पर्यटनाला चालना मिळणार नाही तर स्थानिक लोकांना आणि त्यांच्या छोट्या व्यवसायांना रोजगार निर्माण होण्यास मदत होईल.

यावेळी त्यांच्या सोबत जीटीडिसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मणेरकर, लक्ष्मीकांत वायगंणकर, अनिल दलाल, आरएफओ सिद्धेश नाईक, संजना व्ही.पी आणि जीटीडिसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT