NCP news in Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची (Ajit Pawar Deputy CM) शपथ घेतली. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी प्रतिक्रीया देत आम्ही सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी होत असून पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहे असे सांगितले.
दरम्यान या राजकीय नाट्यानंतर आता राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये फूट पडली असून एक गट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तर दुसरा गट अजित पवार (Ajit Pawar) यांचा आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून या दोन्ही गटांना पाठिंबा दर्शविला जात आहे.
राष्ट्रवादीचे गोवा प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी महाराष्ट्रातील या राजकीय सत्तांतरावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "गोव्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहेत. शरद पवार जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे पालन आम्ही करु असे सांगत शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Ajit Pawar Oath Ceremony) त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले. तेव्हा मी 5 लोकांना घेवून पक्ष पुन्हा बांधला.
जे काही घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तरी मी लोकांमध्ये जाणार. महाराष्ट्रात जिथे जाता येईल तिथे लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू. उद्या कराडला प्रीतीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे असे शरद पवार यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.