Town And Country Planning Department Goa Goa TCP
गोवा

Goa TCP: झोन बदलावर पुर्नविचार करावा; टाऊन प्लॅनरना निवेदन सादर

Town Plannning Act: नगर नियोजन कायद्याच्या ३९ए कलमाखाली झोन बदलाला वाढता विरोध होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: नगर नियोजन कायद्याच्या ३९ए कलमाखाली झोन बदलाला वाढता विरोध होत आहे. गोंयच्या फुडले पिळगेखातीर संस्थेने आक्षेप घेतले असून त्याची प्रत नगर नियोजन खात्याला पाठविले आहेत. ‘गोंयच्या फुडले पिळगेखातीर’ संस्थेचे अध्यक्ष जॅक मास्कारेन्हस यांनी मुख्य टाऊन प्लॅनरची भेट घेऊन त्यांना आक्षेप घेतलेले निवेदन सादर केले.

सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे २०२१च्या क्षेत्रीय आराखड्यातील नियम चारचा उपनियम दोन प्रमाणे जवळ जवळ २२ मालमत्त्यांवर परिणाम होणार आहे. त्यातील ५ कुंडई व १५ उसगावातील आहेत. गेल्या महिन्यात गोंयच्या फुडले पिळगेखातीर संस्थेने आक्षेप घेणारी निवेदने सादर केली होती. ज्या २२ मालमत्तांवर परिणाम होणार आहे, त्यांना या कायद्यातुन वगळावे अशी विनंती करुन झोन बदलावर परत एकदा पुर्नविचार करावा अशी मागणी या संस्थेने केली आहे.

दरम्यान कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली कुडतरीतील नागरीकांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू (आयएएस) यांची भेट घेतली व सर्वे नंबर ४४९/० व १८/२ या जागा नो डेव्हलपमेंट स्लोप मधून सेटलमेंट झोन मध्ये समावेश करण्यास विरोध करणारे निवेदन सादर केले. या वेळी कुडतरीचे सरपंच आलसिन्हा डिसिल्वा व पंच सदस्य उपस्थित होते. यापूर्वी २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना कुडतरी पंचायतीने निवेदन देऊन नगर नियोजन खात्याच्या ३९ए कलमात झोन बदल करण्यास आक्षेप घेतला होता. हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

...तर वायनाडसारखी स्थिती उद्‌भवेल!

फेब्रुवारीतील ग्रामसभेतही झोन बदलास विरोध करणारा ठराव मंजूर झाला होता. जर या मालमत्तांचा सेटलमेंट झोनमध्ये समावेश केला तर वायनाडप्रमाणे स्थिती इथेही उद्‍भवण्याची शक्यता आहे,असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

Horoscope: हा आठवडा आव्हानात्मक! 'या' 3 राशींसाठी कामावर सावधगिरी आवश्यक, अन्यथा नुकसानं पक्कं

"माझे वडील वाचले, कारण रवी नाईक!" - मंत्री विश्वजीत राणे भावूक; Watch Video

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

SCROLL FOR NEXT