Goa TCP: वादग्रस्त ‘डेव्हिल्स’ची ‘टीसीपी’कडून पाहणी; अहवाल वरिष्ठांना सादर करणार

IllegL Nightclub scrutiny: न्यायालयाकडून अकरा बेकायदा क्लबवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले होते
IllegL Nightclub scrutiny: न्यायालयाकडून अकरा बेकायदा क्लबवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले होते
Devils NightclubDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: बागा-कळंगुट येथे बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या ताओ नाईट क्लबवर अतिक्रमण विरोधी पथक तसेच स्थानिक पंचायत मंडळाकडून हल्लीच कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी येथील न्यायालयाकडून सहा महिन्यांपासून सील ठोकण्यात आलेल्या वादग्रस्त डेव्हिल्स नाईट क्लबची नगरविकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

दरम्यान, ‘डेव्हिल्स’च्या तपासणीचा अहवाल आपण आपल्या वरिष्ठांना सादर करणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

कळंगुटमधील सामाजिक कार्यकर्ते कुंदन केरकर तसेच सुदेश मयेकर यांच्याकडून कळंगुट व परिसरात बेकायदा कार्यरत असलेल्या एकूण तेरा नाईट क्लबच्या विरोधात न्यायालयात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाकडून अकरा बेकायदा क्लबवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

पैकी बागा येथील ताओ नाईट क्लब पूर्णपणे पाडण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आलेले असून बागा येथील वादग्रस्त तसेच सील ठोकण्यात आलेल्या ‘डेव्हिल्स’ची नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहाणी करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार कळंगुट व परिसरातील बहुतेक नाईट क्लब बंद असल्याने या भागातील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे सुदेश मयेकर तसेच कुंदन केरकर यांनी सांगितले.

IllegL Nightclub scrutiny: न्यायालयाकडून अकरा बेकायदा क्लबवर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले होते
TCP: येत्या सहा महिन्यात नवा कायदा; शहर आणि नगर नियोजन मंत्री राणे यांची माहिती

‘तो’ डाव हाणून पाडू!

न्यायालयाकडून कारवाई करण्यात आलेल्या एक-दोन वादग्रस्त क्लबना स्थानिक पंचायतीकडून पुन्हा परवाने देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, पंचायतीचा हा प्रयत्न निश्चितच हाणून पाडला जाणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com