Horrifying Experience Of Satara Tourist While Traveling To Goa Dainik Gomantak
गोवा

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दिसला व्यक्ती, गाडीतून उतरताच कळाले 'ट्रॅप' आहे; गोव्याला येताना साताऱ्यातील मुलांवर बेतला जीवघेणा प्रसंग

अखेरच्या वेळेला त्यांना ही घटना एक 'ट्रॅप' असल्याचे लक्षात आले अन् त्यांनी स्वत:चा बचाव करून भरधाव वेगात थेट गोवा गाठला आणि सुटकेचा निश्वास सोडला.

Pramod Yadav

Horrifying Experience Of Satara Tourist While Traveling To Goa: प्रवास म्हटले की प्रत्येकाला विविध अनुभव येत असतात, त्यात रात्रीच्या प्रवासात काही विचित्र घटना आणि प्रसंगाशी देखील समना होत असतो. असे प्रसंग काहीवेळा जीवघेणे ठरू शकतात किंवा काहीवेळा यातून आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या घटना देखील होत असतात.

असाच काहीसा अंगावर काटा आणणारा प्रसंग साताऱ्यातून गोव्यात (Satara Tourist In Goa) येणाऱ्या पर्यटक मुलांसोबत घडला. अखेरच्या वेळेला त्यांना ही घटना एक 'ट्रॅप' असल्याचे लक्षात आले अन् त्यांनी स्वत:चा बचाव करून भरधाव वेगात थेट गोवा गाठला आणि सुटकेचा निश्वास सोडला.

साताऱ्याच्या भुईंज (Bhuinj, Satara) तालुक्यातील मुलांसोबत 30 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास गोव्याला येताना ही घटना घडली. वर्षभर सतत कामात व्यस्त असल्याने थोडा विसावा म्हणून वेळ काढून आठ मित्र गोव्याला यायला निघाले, रात्रीचा प्रवास करून पहाटे गोव्यात दाखल व्हायचे असा त्यांचा प्लॅन ठरला. आठही मित्र विविध प्रकारचे व्यवसाय करतात. प्लॅन ठरल्यानंतर दोन चारचाकी वाहने तयार करून त्यांनी 30 मे रोजी प्रवासाला सुरूवात केली.

साताऱ्यातून प्रवासाला सुरूवात केल्यानंतर त्यांचा ताफा कोल्हापूरातील शेवटचा टोलनाका क्रॉस करून एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबला. चहा घेतल्यानंतर पुन्हा गोव्याच्या दिशेने प्रवासाला सुरूवात झाली, कर्नाटकची सीमा पार करून त्यांची वाहने जंगाली भागातून मार्गक्रमन करू लागली. गाडीत संगीत सुरू होते तरी दोन्ही गाडीतील काही मुले झोपी गेली, अन् रात्रीच्या भयाण शांतेत त्यांचा प्रवास सुरू होता.

जंगल भागातून प्रवास सुरू असताना पुढे एक तीव्र उतार लागला, चालक मार्गाचा अंदाज घेत वाहनावर हाकत होते. दरम्यान, कारच्या प्रकाशात समोर एक विचित्र घटना दिसली, एक व्यक्ती दुचाकीसह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेला दिसला. कदाचित अपघात झाला असवा आणि तो व्यक्ती जखमी झाला असावा या भावनेने गाडीत त्यावेळी जागा असलेल्या एकाने मोठ्याने ओरडत, 'पुढे बघ, ब्रेक मार' असा आवाज दिला.

एकाने आवाज दिल्याने गाडीतील इतर लोक जागे झाले. आणि समोरची कार थांबल्याने पाठीमागून येणारी कार देखील थांबली. समोरच्या कारमधील दोन मुले त्या व्यक्तीला मदत करण्याच्या भावनेने दार उघडून खाली उतरली. दरम्यान, एकाने खाली उतरलेल्या मुलाला फोन करून हा ट्रॅप असल्याची कल्पना दिली आणि पुन्हा गाडीत बसण्यास सांगितले.

खाली उतरलेली मुले सतर्क झाली त्यांनी धावपळ करत पुन्हा गाडीच्या दिशेने धावली. त्याने लगेच गाडी सुरू करण्यास सांगितले पण, तोपर्यंत 10 ते 15 जणांची टोळी हातात धारदार हत्यारे घेऊन त्यांच्या दिशेने धावत यायला लागली. आता आपण पुरते फसलो अशी भावना त्या मुलांची झाली. सुदैवाने त्यांची कार तात्काळ सुरू झाली व सर्वजण पुन्हा त्यात बसून भरधाव वेगात निघून गेले.

त्यानंतर रस्त्यावर पडलेला व्यक्ती वाहने सुरू होताच उठून उभा राहिला तर, त्याच्या अंगावर रक्त नसून रक्ताच्या रंगाचा दिसणारा रंग असल्याचे दिसून आले. दोन कार भरधाव जाताहेत त्यामागे त्यांचा पाठलाग 15 जणांचे टाळके करत होते पण, तोपर्यंत त्यांनी बरेच अंतर पार केले होते.

या प्रसंगामुळे दोन्ही कारमधील सर्वचजण चांगलेच धास्तावले होते. पहिल्यांदाच गोव्याला येताना त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग त्यांना अनेक गोष्टी शिकवून गेला असे या ग्रुपमधील सदस्याने सांगितले. तसेच, गोव्याकडे यामार्गे जाताना रात्रीचा प्रवास टाळा असेही त्यांनी सांगितले.

आंबोली घाट सुरू होण्याच्या फार पूर्वी असलेल्या जंगल भागातील नागमोडी मार्ग आणि तीव्र उतारावर ही घटना घडली. पहिल्यांदाच या मार्गावर प्रवास करत असल्याने या भागाची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, घडलेल्या या प्रसंगाचे वर्णन एका सदस्याने फेसबुकवर केले आहे. त्या सदस्यांशी संपर्क केला असता त्यांनी वरील माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT