Goa: 'गोव्याची सुट्टी नाही पण, परतीचा प्रवास लक्षात राहिला'; पर्यटकाने सांगितला विचित्र अनुभव

महाराष्ट्रातील औरंगाबादचा एक पर्यटक गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी आला होता. सुट्टी संपल्यावर त्याने परतीच्या प्रवासाचा विचित्र अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे.
Goa To Maharashtra
Goa To Maharashtra Dainik Gomantak

गोवा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात मौजमजा करण्यासाठी येत असतात. गोव्यातील समुद्र किनारे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच रेलचेल या राज्यात असते. नववर्षाचे स्वागत असो किंवा नाताळचा उत्सव पाहण्यणासाठी अनेक पर्यटक गोव्यात हजेरी लावतात. असाच महाराष्ट्रातील औरंगाबादचा एक पर्यटक गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी आला होता. सुट्टी संपल्यावर त्याने परतीच्या प्रवासाचा विचित्र अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे.

(Goa to Aurangabad, Maharashtra Travel Experience By Tourist)

Goa To Maharashtra
Goa Police AI Poem: गोवा पोलिसांवरील 'ही' AI जनरेटेड कविता एकदा अवश्य वाचा!

काय अनुभव शेअर केला आहे पर्यटकाने?

औरंगाबादचा प्रवाशी एक आठवड्याची गोव्यातील आपली सुट्टी पूर्ण करून परत जाणार होता, त्यासाठी त्याने फ्लाईट देखील बुक केली पण, ऐनवेळी त्याची फ्लाईट रद्द झाली. दुसरी फ्लाईट एक आठवडा उशीरा असल्याने त्याने खासगी बसने जायचा निर्णय घेतला. त्यासाठी रात्री नऊला सुटणारी एक खासगी बस त्याने बुक केली. त्यानंतर दिवसभर फिरून तो बससाठी पणजीतील त्या बस कार्यालयात आला. पण, बस थांब्यावर येऊन बस थांबली ती कायमचीच. शेवटी बसला धक्का मारून रात्री एक वाजता ती सुरू झाली. पण, पुढे जाऊन डोंगराळ भागात रात्री साडे तीन वाजता ती पुन्हा बंद पडली.

Goa To Maharashtra
GCET: गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, अखेरच्या GCET परीक्षेची तारीख जाहीर

सकाळी आठ वाजेपर्यंत तेथेच थांबल्यावर एक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस त्याठिकाणी आली. त्या बसने प्रवास सुरू झाला पण, एक महिलेचा मोबाईल जुन्या बसमध्ये राहिल्याने ती बस थांबविण्यात आली. पुढे एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी ती बस थांबली पण, ती बस त्याला न घेताच निघून, त्याला घेण्यासाठी बस पुन्हा आगारात आली. मात्र बसमध्ये बसल्यावर त्या प्रवाशाचा मोबाईल गगनबावडा येथील बसस्टॉपवर राहिल्याचे त्याच्या लक्षात आले यावेळी मात्र बस मागे आली नाही. त्याचा मोबाईल दुसऱ्या बसने पुढे पाठविल्याचे त्याला सांगण्यात आले. पुण्यात पोहोचल्यावर त्याची मुंबई - औरंगाबाद फ्लाईट देखील मिस झाली. मग त्याने शिवशाही पकडून औरंगाबादपर्यंतचा प्रवास पूर्ण केला.

Goa To Maharashtra
Mahadayi Water Dispute: लोकांमध्ये तीव्र असंतोष; गोव्यात जनआंदोलन उभे राहणार

गाडीत बसूनच त्याने ट्विटरवर हा मोठा थ्रेड लिहला असल्याचे तो म्हणाला, तसेच एवढे दिवस गोव्यात थांबलो ते नाही पण, गोव्यातून परतीचा प्रवास कायम लक्षात राहिला असे या प्रवाशाने आपल्या अनुभवात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com